Video | करण, राजवीर आणि सनी देओलचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले की….
सनी देओलचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट चुप उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यापासून चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्साह बघायला मिळतो.
मुंबई : सनी देओलच्या (Sunny Deol) चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट (Chup: Revenge of the Artist) हा चित्रपट उद्या अर्थात 23 सप्टेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यापूर्वी सनी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. सनीचे आणि त्याच्या मुलांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी सनीच्या मुलांचे काैतुक केले आहे. राजवीर देओल आणि करण देओल हे सनीसोबत दिसले. मुलांची आणि बापाची ही जोडी चाहत्यांना आवडली असून या फोटोंवर (Photo) चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
इथे पाहा सनी देओलचा व्हिडीओ
View this post on Instagram
सनी देओलचा मुलांसोबतच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
सध्या सोशल मीडियावर करण देओल, राजवीर देओल आणि सनी देओलचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये सनी आपल्या मुलांसोबत दिसतोय. या व्हिडीओमध्ये तिघेही कॅज्युअल लूकमध्ये आहेत. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते आहे की, हे तिघे कुठेतरी फिरायला गेले होते. त्यावेळी चाहते फोटो आणि व्हिडीओ यांच्यासोबत काढत आहेत. या व्हिडीओमध्ये सनी देओलचा जबरदस्त लूक दिसतोय. सनीच्या मुलांना पाहून नेटकरी म्हणाले की, जबरदस्त व्यक्तिमहत्व…
कॅज्युअल लूकमध्ये तिघांचा जबरदस्त लूक
सनी देओलचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट चुप उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यापासून चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्साह बघायला मिळतो. या चित्रपटामध्ये सनी देओल एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असल्याची माहिती मिळत आहे. आता सनीचा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काय कमाल करेल हे बघण्यासारखेच ठरणार आहे. पूजा भट्ट देखील या चित्रपटामध्ये दिसणार आहे.