Sunny Leone | चित्रपटाच्या शूटिंगवेळी सनी लिओनी हिचा मोठा अपघात, पायाला दुखापत
हा व्हिडीओ पाहून सनी लियोनी हिचे चाहते तिला काळजी घेण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
मुंबई : अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) हिला चित्रपटाच्या सेटवर दुखापत झालीये. इतकेच नाही तर सनी लिओनीच्या पायामधून रक्त देखील निघत आहे. या दरम्यान सनी लियोनी घाबरलेली दिसत आहे. चित्रपटाच्या शूटिंग वेळी सनी लियोनी हिला ही दुखापत झालीये. सनी लियोनी हिच्या दुखापतीचा हा व्हिडीओ (Video) पाहून तिचे चाहते टेन्शनमध्ये आले आहेत. या व्हिडीओमध्ये इंजेक्शनचे नाव ऐकल्यानंतर सनी लियोनी ही घाबरताना दिसत आहे. जखम झालेल्या ठिकाणी सनी लियोनी ही कोणालाही हात लावू न देताना दिसत आहे. मात्र, सेटवरील एक जण सनी लियोनी हिचा हात धरतो आणि जखम साफ करायला लावतो. सनी लियोनी हिचा हाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर (Social media) तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सनी लियोनी हिचे चाहते तिला काळजी घेण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
सनी लियोनी हिच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तिच्या पायाला जखम झाल्याचे दिसत आहे. विशेष बाब म्हणजे स्वत: सनी लियोनी हिनेच हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये सनी लियोनी खूपच घाबरलेली दिसत आहे. सनी लियोनी हिने हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिले की, कोटेशन गँग या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी ही दुखापत झालीये. कोटेशन गँग हा सनी लियोनी हिचा आगामी चित्रपट आहे.
View this post on Instagram
सध्या कोटेशन गँग या चित्रपटाची शुटिंग सुरू असून यादरम्यानच तिला दुखापत झालीये. सनी लियोनी हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये इतरही लोकांचा आवाज ऐकू येत आहे.
चित्रपटाच्या सेटवरील एकाने टिटॅनसचे इंजेक्शन घ्यावे लागेल, असे म्हटल्यानंतर सनी लियोनी घाबरली आणि तिने इंजेक्शन घेण्यास सरळ नकार दिला. जखम साफ केल्यानंतर रक्त येणे बंद झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
सनी लियोनी हिच्या या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. एका युजर्सने कमेंट करत लिहिले की, तुझे पण रक्त लाल आहे का? दुसऱ्याने लिहिले की, दुखापत हिला झाली आहे आणि त्रास मलाच होत आहे.