Drugs Case | बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी होता फरार, सुशांत सिंह राजपूतचा मित्र कुणाल जानीला अखेर अटक!
वांद्रे येथील एका मोठ्या हॉटेलचे संचालक कुणाल जानी (Kunal Jani) याला एनसीबीने अखेर अटक केली आहे. होएल संचालक कुणाल जानी हा दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा मित्र होता.
मुंबई : वांद्रे येथील एका मोठ्या हॉटेलचे संचालक कुणाल जानी (Kunal Jani) याला एनसीबीने अखेर अटक केली आहे. होएल संचालक कुणाल जानी हा दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा मित्र होता. एनसीबीचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी कुणाल याला अटक केली आहे. ही अटक बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन (Bollywood Drugs connection) प्रकरणात करण्यात आली आहे. कुणाल जानी याला गुन्हा क्रमांक 24/2020 मध्ये केली अटक करण्यात आली आहे. सुशांतच्या मृत्युनंतर कुणाल हा 24/2020 क्रमांकाच्या गुन्ह्यात फरार होता. अखेर त्याला काल (29 सप्टेंबर) खार भागातून अटक करण्यात एनसीबीला यश आले आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी तपासणी करताना बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले. यावेळी वांद्रे येथील रेस्टॉरंटचे संचालक कुणाल जानी याचीही या प्रकरणी चौकशी करण्यात आली होती. माध्यमांच्या अहवालानुसार कुणाल जानी हा त्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा एक भाग होता, ज्यात रिया चक्रवर्ती देखील सहभागी होती. ईडीला रियाच्या फोनवर चॅट देखील सापडले होते, ज्यामध्ये कुणाल सहभागी होता. या चॅटमध्ये दोघेही चरस आणि डूबीज या ड्रग्जबद्दल बोलत आहेत. या ग्रुपमध्ये रिया आणि सॅम्युअल ड्रग्जबद्दल बोलताना आढळले. यावेळी ईडीनेही कुणालची 6 तास चौकशी केली होती. मात्र, यानंतर तो फरार झाला होता.
Drugs cases related to the death of actor Sushant Singh Rajput | Narcotics Control Bureau (NCB) arrested hotelier Kunal Jani (in file pic) from Mumbai’s Khar area. He was a close friend of Rajput and was absconding. pic.twitter.com/fxecPkv8rW
— ANI (@ANI) September 30, 2021
रिया-शौविक देखील सामील
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज केसमध्ये रियाचं नाव पुढे आलं होतं. त्यानंतर तिला अटक करण्यात आलं होतं त्यानंतर ती जवळपास एक महिन्यापर्यंत तुरुंगात होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तिची जामीन याचिका मंजूर केली. रियासोबत तिचा भाऊ शौविकलाही अटक करण्यात आली होती. शौविकला तीन महिन्यांनंतर उच्च न्यायालयाने जामीन दिली.
रियाने दिली ड्रग्जची कबुली
रियाने यापूर्वीच स्वतःच घरात ड्रग्स आणत असल्याचं मान्य केलं आहे. नोव्हेंबर 2019 पासून याची सुरुवात झाली होती. एवढंच नाही तर ड्रग्ससाठी रियानं भाऊ शौविकलाही आधीच पैसे ट्रान्सफर केले होते. ज्यामुळे आता NCB नं रियावर ड्रग्स खरेदी करण्याचे आणि ते सुशांतला पुरवण्याचे आरोप लावले आहेत.
सुशांतला मारिजुआना आणि गांजा दिला जात असे. रिया व्यतिरिक्त तिचा भाऊ शौविक, सुशांतच्या घरातील मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत आणि ऋषीकेश पवार नावाचा अन्य एक आरोप ड्रग्स खरेदी करून सुशांतला पुरवत असे असं एनसीबीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये नमुद करण्यात आले होते. यातील काही आरोपी हे जमिनावर बाहेर आले आहेत. तसेच या केसचा अधिक तपास अद्याप सुरू आहे.
हेही वाचा :
पुन्हा एकदा चर्चेत आली रानू मंडल, तिच्याच शैलीत गायलं ‘Manike Mage Hithe’ गाणं – पाहा व्हिडीओ
Rakhi Sawant | तोकडे कपडे फिरंगी मैत्रिणी… राखी सावंत नव्या फोटोंमुळे सोशल मीडियावर जोरदार ट्रोल!