Sushant Singh Rajput: “त्याने आत्महत्या केली नाही, रियाने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं”; सुशांतच्या बहिणीचा आरोप

सुशांतची बहीण प्रियांका सिंह राजपूत (Priyanka Singh Rajput) यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी म्हटलं, "ज्या क्षणी मी सुशांतचा मृतदेह पाहिला, तेव्हाच मला समजलं होतं की ही आत्महत्या नाही."

Sushant Singh Rajput: त्याने आत्महत्या केली नाही, रियाने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं; सुशांतच्या बहिणीचा आरोप
Rhea Chakraborty, Sushant Singh RajputImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 12:12 PM

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाने सबंध चित्रपटसृष्टीला आणि चाहतावर्गला मोठा धक्का बसला होता. 2020 मध्ये मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळला होता. सुशांतने आत्महत्या केली असं म्हटलं जात असून अजूनही त्याच्या मृत्यूचा तपास सुरू आहे. तर दुसरीकडे सुशांतची बहीण प्रियांका सिंह राजपूत (Priyanka Singh Rajput) यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी म्हटलं, “ज्या क्षणी मी सुशांतचा मृतदेह पाहिला, तेव्हाच मला समजलं होतं की ही आत्महत्या नाही.” सुशांतच्या मृत्यूचा तपास सध्या सीबीआय करत आहे. त्याच्या मृत्यूप्रकरणाचा पैशांच्या आणि ड्रग्जच्या अँगलनेही तपास करण्यात आला. अंमलबजावणी संचालनालय आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनेदेखील (NCB) सुशांतच्या मृत्यूसंदर्भात स्वतंत्र तपास केला.

‘इंडिया न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियांका सिंह म्हणाल्या, “मी स्वतः फौजदारी वकील आहे आणि मी हुंडाबळी, आत्महत्या आणि इतर भयंकर मृत्यूच्या केसेस हाताळल्या आहेत. कधी कोणाचे डोळेच बाहेर आले आहेत, तर कधी कोणाची जीभ बाहेर.. अशा अनेक केसेस पाहिल्या आहेत. अशा केसेसमध्ये शरीरातून स्त्राव होतो आणि माझ्या भावाच्या बाबतीत असं काहीच झालं नव्हतं. त्याच्या निधनाच्या काही दिवसांनंतर मी त्याच्या खोलीत प्रवेश केला. मी छताकडे पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की तो हे करूच शकत नाही. सुशांतचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत ज्या ठिकाणी पाहिलं गेलं, ती जागासुद्धा मी पाहिली. पण बेड आणि फॅनमधील अंतर सुशांतच्या उंचीइतकीही नव्हती. तेवढं अंतरच त्यात नाही.”

हे सुद्धा वाचा

प्रियांका पुढे म्हणाल्या, “2019 पासून जेव्हा रिया चक्रवर्तीने त्याच्या आयुष्यात प्रवेश केला तेव्हापासून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ लागलं होतं. तेव्हा पहिल्यांदा माझ्यात आणि माझ्या भावामध्ये वाद निर्माण झाले. अवघ्या सहा दिवसांत हे सर्व घडलं होतं.” रियाला कोणीतरी जाणूनबुजून त्याच्या आयुष्यात पाठवलं असावं का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता त्या म्हणाल्या, “हो, नक्कीच.”

पहा फोटो-

सुशांतचं निधन झालं त्यावेळी तो रियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्याच्या निधनाच्या काही दिवसांनंतर सुशांतचे वडील केके सिंग यांनी रियावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता. हे प्रकरण मनी लाँड्रिंग आणि ड्रग्जच्या आरोपांची चौकशी करणार्‍या अंमलबजावणी संचालनालय आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसह केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे हस्तांतरित करण्यात आलं.

सप्टेंबर 2020 मध्ये रिया आणि तिचा धाकटा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना NCB ने अटक केली होती. दोघांना मुंबईच्या भायखळा कारागृहात पाठवण्यात आलं होतं. रिया कारागृहात जवळपास महिनाभर होती आणि तीन महिन्यांनंतर तिला जामिन मिळाला. गेल्या वर्षी मुंबईतील एका न्यायालयाने रियाचा लॅपटॉप, मोबाईल फोन आणि तपासादरम्यान जप्त केलेले इतर गॅझेट्स तिला परत करण्याचे आदेश दिले होते.

एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून सुशांत घराघरात पोहोचला. या मालिकेती त्याची सहअभिनेत्री अंकिता लोखंडेलाही त्याने डेट केलं होतं. हे दोघं जवळपास सहा वर्षे एकत्र होते. 2013 मध्ये सुशांतने ‘काय पो चे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘राबता’, ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या होत्या. त्याच्या निधनानंतर त्याचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. त्याच्या निधनानंतर छिछोरे या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.