Sushant Singh Rajpur: ‘ब्रह्मास्त्र’वरून सुशांतच्या बहिणीने साधला बॉलिवूडवर निशाणा

शांतची बहीण मीतू सिंग (Meetu Singh) यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. 'बॉलिवूडला उद्ध्वस्त करण्यासाठी सुशांतचा ब्रह्मास्त्र (Brahmastra) पुरेसा आहे', असं त्यांनी लिहिलंय.

Sushant Singh Rajpur: 'ब्रह्मास्त्र'वरून सुशांतच्या बहिणीने साधला बॉलिवूडवर निशाणा
सुशांतच्या बहिणीच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 3:28 PM

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) हा 2020 मध्ये मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढलला. सुशांतने आत्महत्या केली अशी चर्चा असून सध्या सीबीआय त्याच्या मृत्यूचा तपास करत आहे. आता सुशांतची बहीण मीतू सिंग (Meetu Singh) यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. ‘बॉलिवूडला उद्ध्वस्त करण्यासाठी सुशांतचा ब्रह्मास्त्र (Brahmastra) पुरेसा आहे’, असं त्यांनी लिहिलंय.

सुशांतचा फोटो पोस्ट करत मीतू यांनी लिहिलं, ‘या बॉलिवूडचा सर्वनाश करण्यासाठी सुशांतचा ब्रह्मास्त्र पुरेसा आहे. बॉलिवूडला नेहमीच जनतेवर हुकूम गाजवायचा असतो. परस्परांविषयी आदर आणि नम्रता दाखवण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. नैतिक मूल्यांनी समृद्ध असलेल्या आपल्या देशाचा चेहरा असे लोक कसे असू शकतात? खोट्या दिखाऊपणाने जनतेचं प्रेम जिंकण्याचा त्यांचा खेदजनक प्रयत्न चांगलाच फसला आहे. गुणवत्ता आणि नैतिक मूल्ये या एकमेव गोष्टी आहेत ज्या प्रशंसा आणि आदर मिळवू शकतात.’

हे सुद्धा वाचा

मीतू यांनी सुशांतचा एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो आयआयटी बॉम्बेमध्ये बोलताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याच्या बहिणीने लिहिलं, ‘प्रत्येकजण सुशांत आणि त्याच्या अलौकिक बुद्धिमत्तेला ओळखतो. परंतु त्याची स्वतःची इंडस्ट्री, बॉलिवूड ही त्याला ओळखण्यात अयशस्वी ठरली. ही खरोखर एक शोकांतिका आहे. माझ्या एकुलत्या एका राजपुत्राला (SSR) दिलेल्या या हृदयस्पर्शी श्रद्धांजलीबद्दल मी या स्वीडिश YouTuber pewdiepie (फेलिक्स)ची खूप आभारी आहे. माझ्या भावाचं कौतुक आणि आदर होताना पाहणं खूप आनंददायी आहे. बॉलिवूडने मत्सर आणि असुरक्षिततेतून सुशांतला मारलं आणि आता सुशांत प्रत्येक घराघरात पोहोचला आहे. प्रत्येक कुटुंब हा सुशांतला आपलाच मुलगा मानून त्याला न्याय मिळावा यासाठी लढतोय.’

सुशांतच्या मृत्यूचे विविध अँगल तपासण्याची जबाबदारी सीबीआयवर सोपवण्यात आली. सुशांतच्या निधनानंतर पाटणामधील त्याच्या घराचं रुपांतर स्मारकात करण्यात आलं. सुशांतचा टेलिस्कोप, त्याची पुस्तकं, गिटार आणि इतर खासगी वस्तू त्याठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.