शेवटी रक्ताची आठवण येणारच… काळजात धस्स… प्रत्येक शब्द काळजाला भिडणारा

प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला आता चार वर्ष होत आहेत. पण सुशांत अधूनमधून चर्चेत असतो. कोणत्या ना कोणत्या विषयात त्याचं नाव घेतलं जातं. यावेळीही तो चर्चेत आला आहे. सुशांतच्या बहिणीने त्याच्या आठवणींना उजाळा दिला आणि पुन्हा एकदा सुशांत चर्चेत आला आहे. सुशांतच्या बहिणीने सुशांतच्या मृत्यूनंतरच्या अनेक गोष्टी सांगितल्या.

शेवटी रक्ताची आठवण येणारच... काळजात धस्स... प्रत्येक शब्द काळजाला भिडणारा
Sushant Singh RajputImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 03, 2024 | 11:07 PM

मुंबई | 3 मार्च 2024 : सुशांतच्या अस्थी खोलीत होत्या. त्या रात्री तो माझ्या स्वप्नात आला. त्याने माझी गळाभेट घेतली. माझ्याशी खूप बोलला. माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. आम्ही तब्बल तीन तास बोलत होतो. त्याच्या असण्याचा गंध माझ्या रोमारोमात भिनला होता. तो अंत्यत साधा आणि निरागस वाटत होता. जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा तो माझ्या जवळ नव्हता. पण तो आसपासच असल्याची जाणीव होती. त्याच्याशी काय चर्चा झाली हे मी विसरले. पण त्याच्या असण्याचा मला अजूनही भास होतोय… अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची बहीण श्वेता सिंह कीर्ति बोलत होती. श्वेता बोलत असताना तिचा प्रत्येक शब्द काळजाला भिडत होता. काळजात धस्स होत होतं.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला आता चार वर्ष पूर्ण झाले आहेत. पण अजूनही सुशांत चर्चेत असतो. सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्ति हिने एका युट्यूबरला एक मुलाखत दिली. त्यामुळे पुन्हा एकदा सुशांत चर्चेत आला आहे. तिने या मुलाखतीत सुशांतविषयी अनेक खुलासे केले. तिच्या स्वप्नाचीही माहिती दिली. सुशांत याचा अंतिम संस्कार सुरू होता. मी कॅलिफोर्नियातून आले होते. मी त्याला या जगात आणल्याचं सर्व म्हणत होते. त्यामुळे भावाला योग्य पद्धतीने अंतिम निरोप द्यावा ही माझी जबाबदारी होती. एकदम अध्यात्मिक. गरुड पुराणाचा पाठ करावा, महामृत्यूंजय जप करून त्याला अंतिम निरोप द्यावा. हे मी ठरवून आले होते. तो माझा हेतू होता, असं श्वेता म्हणाली.

स्वप्नांबाबत खुलासा

यावेळी श्वेताने तिला पडलेल्या स्वप्नाचाही खुलासा केला. बहुतेक दुसरा किंवा तिसरा दिवस असेल. मला आठवतंय, बाबांना शेवटचं दर्शन घ्यायचं होतं. त्यामुळे आम्ही बाबांच्या रुममध्ये गेलो. मी दुसऱ्या रुममध्ये होते. मी झोपलेले होते. मला आठवतंय मी स्वप्नात त्याला (सुशांत) आलेलं पाहिलं. आम्ही दोन ते तीन तास चर्चा केली. त्याने मला घट्ट मिठी मारली. त्याच्या भेटीचा गंध माझ्या मनात खोलवर बसला. त्याने केलेला स्पर्श मला जाणवला. मला सर्वकाही जाणवलं…, असं श्वेता म्हणाली.

सर्व आठवत होतं, पण…

मी त्याला अनेक प्रश्न विचारले. त्याच्या अस्थी त्याच खोलीत टेबलवर होत्या. तो वास्तवातील जगापेक्षा अधिक सच्चा वाटत होता. त्यावेळी मला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. जणू काही सर्व काही अलबेल झालं. मी सकाळी उठले तेव्हा तो माझ्या आसपास असल्याचं मला जाणवत होतं. त्याचा गंध आठवत होता. त्याचं गळाभेट घेणं आणि कपाळाचं चुंबन घेणं आठवत होतं. पण आम्ही जी चर्चा केली ते सर्व मी विसरले होते, असंही तिने सांगितलं.

तोच सर्व करतो…

सुशांतने माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली होती, असंही तिने सांगितलं. यावेळी श्वेताने एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली. त्या दिवसापासून सुशांत मला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे. मी पूजा करते तेव्हा त्याचं गाणं वाजतं. कुठे जात असेल तरीही त्याचं गाणं वाजतं. मी त्याचं गाणं लावत नाही, पण अचानक ते लागतं. असं काही झालं तर माझा भाऊ माझ्यासोबत आहे. तोच हे सगळं करतोय असं मला वाटतं, असंही तिने स्पष्ट केलं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.