अर्सलान गोनीसोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब? बर्थडे पोस्टवर सुझान खानच्या प्रतिक्रियेने रंगल्या चर्चा!

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची माजी पत्नी सुझान खान सध्या चर्चेचा भाग बनली आहे. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. मध्याम वृत्तांवर विश्वास ठेवला तर सुझान अली गोनीचा भाऊ अर्सलान गोनीला डेट करत आहे. मात्र, अद्याप दोघांनीही याला अधिकृत म्हटले नाहीय.

अर्सलान गोनीसोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब? बर्थडे पोस्टवर सुझान खानच्या प्रतिक्रियेने रंगल्या चर्चा!
Sussane-Arslan
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 12:07 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची माजी पत्नी सुझान खान सध्या चर्चेचा भाग बनली आहे. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. मध्याम वृत्तांवर विश्वास ठेवला तर सुझान अली गोनीचा भाऊ अर्सलान गोनीला डेट करत आहे. मात्र, अद्याप दोघांनीही याला अधिकृत म्हटले नाहीय.

सुझान खानने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. सुझानच्या वाढदिवसानिमित्त अर्सलाननेही एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने तिला डॉर्लिंग म्हटलेआहे. त्या पोस्टवर सुझानची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर असे दिसते की, दोघांनाही आता आपले नाते कोणापासून लपवायचे नाही.

सुझानची प्रतिक्रिया पाहून रंगल्या चर्चा

सुझानसोबतचा एक फोटो शेअर करत अर्सलानने लिहिले की, ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डार्लिंग… मी प्रार्थना करतो की तुमचे हे वर्ष आणि आयुष्य खूप चांगले जावो. मला माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्ती भेटली आहे आणि हा एक अद्भुत फोटो आहे. देव तुम्हाला जे पाहिजे ते देवो. भरपूर प्रेम.’

पाहा पोस्ट :

View this post on Instagram

A post shared by Arslan Goni (@arslangoni)

सुझानने अर्सलानच्या पोस्टवर कमेंट केली. तिने लिहिले – ‘धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद ‘माझ्या सर्वकाही’.’ तसेच हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.

सुझान आणि अर्सलानच्या पोस्ट्स आणि कमेंट्स पाहता असे दिसते आहे की, ते लवकरच सोशल मीडियावर त्यांचे नाते अधिकृत करणार आहेत. आजच्या काळात बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती देतात.

अर्सलान एक अभिनेता आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो ‘बिग बॉस 14’चा स्पर्धक अली गोनीचा भाऊ आहे. अर्सलान आता सुझान खानच्या प्रत्येक पोस्टवर कमेंट करतो. एके दिवशी पोस्टमध्ये त्यांनी सुझानला स्पेस गर्ल म्हटले होते. दोघेही गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांना ओळखतात. सुझान आणि अर्सलन टीव्ही जगातील त्यांच्या कॉमन मित्रांद्वारे भेटले, असे या सूत्रांनी उद्धृत केलेल्या अहवालात म्हटले आहे.

मैत्रीपेक्षा अधिक…

ते पुढे म्हणतात की, ‘त्यांची केमिस्ट्री पाहिल्यास असे दिसते की, दोघांमध्ये मैत्रीहून अधिक काही तरी नातं फुलतंय. अर्सलन आणि सुझान बर्‍याचदा टीव्ही इंडस्ट्रीमधील आपल्या मित्रांसह हँगआऊट करताना दिसतात. 2014 मध्ये हृतिक रोशनशी तुटलेल्या नात्यानंतर आता सुझान हळू हळू पुढे जात आहे.  मात्र, सुझान आणि अर्सलन यांच्या या नातेसंबंधाबाबत अद्याप दोन्हीही सेलेब्रिटींनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या वृत्ताला त्याने अद्याप काहीही म्हटलेले नाही.

सुझान खान आणि हृतिक रोशनने 2000 साली लग्नगाठ बांधली. दोघांनी 2014 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. विभक्त होऊनही दोघे चांगले मित्र आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांसाठी दोघेही नेहमी एकत्र येतात. लॉकडाऊनमध्येही सुझान आणि हृतिक मुलांसाठी एकत्र राहिले होते.

हेही वाचा :

Kangana Ranaut : कंगना रनौत पोहोचली सेल्युलर जेलमध्ये, याच ठिकाणी वीर सावरकरांना झाली होती काळ्या पाण्याची शिक्षा, पाहा फोटो

Aryan Khan Bail Hearing Live Updates | आर्यन खानच्या जामीनावर आज पुन्हा सुनावणी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.