Swara Bhasker | स्वरा भास्कर प्रचंड ट्रोल, नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल, अगोदर भैया, फिर सैंया…

स्वरा भास्कर हिने फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्याचे जाहिर करताच अनेकांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी तिने फहाद अहमद याच्यासोबतचा एक खास फोटो शेअर केला होता. मात्र, त्या फोटोमध्ये फहाद अहमद याचा चेहरा पूर्ण दिसत नव्हता.

Swara Bhasker | स्वरा भास्कर प्रचंड ट्रोल, नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल, अगोदर भैया, फिर सैंया...
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 9:02 PM

मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिचे लग्न झाले आहे. विशेष म्हणजे अगदी गुपचूप पध्दतीने स्वराने आपला विवाह उरकून घेतला आहे. 6 जानेवारी रोजीच स्वरा लग्नबंधणात अडकलीये. स्वरा भास्कर हिचा पती फहाद अहमद हा समाजवादी पक्षाचा युवाजन सभेचा प्रदेशाध्यक्ष आहे. फहाद अहमद (Fahad Ahmed) याच्यासोबत स्वरा भास्कर हिने कोर्ट मॅरेज केले. लग्न जरी 6 जानेवारी रोजी झाले असले तरीही तिने लग्नाची माहिती आज सोशल मीडियावर शेअर केलीये. इतकेच नाही तर लग्न केल्याची माहिती सांगत स्वरा भास्कर हिने 2 मिनिटे 5 सेकंदाचा एक व्हिडीओही शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तिची संपूर्ण लव्ह स्टोरी दाखवण्यात आलीये. व्हिडीओसोबतच स्वरा भास्कर हिने खास पोस्ट शेअर केली. आता स्वरा भास्कर हिची पोस्ट मोठ्या प्रमाणात ट्रोल (Trolled) होताना दिसत आहे. कारण स्वरा भास्कर हिने फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्याचे जाहिर करताच अनेकांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी तिने फहाद अहमद याच्यासोबतचा एक खास फोटो शेअर केला होता. मात्र, त्या फोटोमध्ये फहाद अहमद याचा चेहरा पूर्ण दिसत नव्हता.

फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्याचे जाहिर करताच स्वरा भास्कर ही प्रचंड ट्रोल झालीये. त्याचे एक मोठे कारण देखील आहे. स्वरा भास्कर हिने केलेले एक जुने ट्विट यावेळी व्हायरल होताना दिसत आहे.

या ट्विटमध्ये स्वरा भास्कर हिने फहाद अहमद याला भाऊ म्हटल्याचे दिसत आहे. यामुळेच आता स्वरा भास्कर हिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. विशेष म्हणजे स्वरा भास्कर हिचे हे ट्विट फहाद अहमद याच्या वाढदिवसाच्या दिवशीचे आहे.

व्हायरल होणाऱ्या ट्विटमध्ये स्वरा हिने फहाद अहमदला भाऊ म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आनंदी राहा, छान जगा आणि लवकरच लग्न करा…अशाप्रकारचे ट्विट स्वरा भास्कर हिने शेअर केले होते.

या ट्विटवरूनच नेटकऱ्यांनी आता स्वरा भास्कर हिला टार्गेट करण्यास सुरूवात केलीये. अनेकांनी स्वरा भास्कर हिला खडेबोल देखील सुनावले आहेत. सोशल मीडियावर स्वरा भास्कर विरोधात संताप वाढताना दिसतोय.

एका युजर्सने लिहिले की, स्वराजी…आपल्या भावासोबतच लग्न केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा…दुसऱ्याने लिहिले की, भैयापासून सैंयापर्यंत खूप चांगला प्रवास…तिसऱ्याने लिहिले की, अगोदर भाऊ आणि नंतर पती…कसा असावा यांचा सर्व प्रवास?

एका युजर्सने लिहिले की, या लोकांना नात्याचे महत्वच नसते. आता स्वरा भास्कर हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्याचे जाहिर करतानाच स्वरा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.