Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swara Bhasker: सलमाननंतर स्वरा भास्करला धमकीचं पत्र; सावरकरांचा अपमान केल्याबद्दल जीवे मारण्याची धमकी

धमकीचं हे पत्र मिळताच स्वराने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी 'पीटीआय'ला दिली.

Swara Bhasker: सलमाननंतर स्वरा भास्करला धमकीचं पत्र; सावरकरांचा अपमान केल्याबद्दल जीवे मारण्याची धमकी
Swara Bhasker: सलमाननंतर स्वरा भास्करला धमकीचं पत्रImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 6:07 PM

काही दिवसांपूर्वीच अभिनेता सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी देणारं निनावी पत्र मिळालं होतं. त्यानंतर आता अभिनेत्री स्वरा भास्करला (Swara Bhasker) धमकीचं पत्र मिळालं आहे. स्पीड पोस्टद्वारे हे निनावी पत्र तिच्या निवासस्थानी पाठवण्यात आलं आहे. हस्ताक्षराने लिहिलेल्या या हिंदी पत्रात स्वराला सावरकर यांचा अपमान केल्याबद्दल जीवे मारण्याची धमकी (death threat) देण्यात आली आहे. या पत्राच्या शेवटी ‘इस देश के नौजवान’ असं लिहिलं आहे. धमकीचं हे पत्र मिळताच स्वराने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी ‘पीटीआय’ला दिली.

स्वरा नेहमीच सोशल मीडियावर बेधडकपणे तिची मतं मांडताना दिसते. सामाजिक विषय असो किंवा राजकीय, स्वराने अनेकदा तिची परखडं मतं ट्विटरवर व्यक्त केली आहेत. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. 2017 मध्ये स्वराने सावरकरांविषयी एक ट्विट केलं होतं. ‘सावरकरांनी ब्रिटिश सरकारची माफी मागितली होती. तुरुंगातून सोडण्याची विनंती केली होती. याला नक्कीच ‘वीर’ म्हणत नाही’, असं ट्विट तिने केलं होतं. 2019 मध्ये तिने सावरकरांविषयी व्हिडीओसह आणखी एक ट्विट केलं होतं.

हे सुद्धा वाचा

2017 मधील स्वराचं ट्विट-

2019 मधील स्वराचं ट्विट-

उदयपूर हत्याकांडप्रकरणीही स्वराने ट्विट करत संताप व्यक्त केला होता. ‘निंदनीय आणि अत्यंत निषेधार्ह. गुन्हेगारांवर कायद्यानुसार त्वरीत आणि कडक कारवाई झाली पाहिजे. हा जघन्य गुन्हा आहे. अन्यायकारक! एकाने म्हटलंय.. देवाच्या नावाने मारायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून करा. मूर्ख राक्षस,’ असं तिने लिहिलं.

BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?.
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्..
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर....
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर...
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर....
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट.
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.