Saroj Khan Biopic | सरोज खान यांचे आयुष्य मोठ्या पडद्यावर चितारणार, टी-सीरीजच्या भूषण कुमारांची घोषणा!
टी-सीरीज कंपनीचे मालक भूषण कुमार यांनी दिग्गज कोरिओग्राफर सरोज खान (Saroj Khan) यांचा बायोपिक जाहीर केला आहे. सरोज खान यांचे गेल्या वर्षी वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.
मुंबई : टी-सीरीज कंपनीचे मालक भूषण कुमार यांनी दिग्गज कोरिओग्राफर सरोज खान (Saroj Khan) यांचा बायोपिक जाहीर केला आहे. सरोज खान यांचे गेल्या वर्षी वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या बायोपिकविषयी बर्याच बातम्या समोर आल्या होत्या, परंतु त्याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी मिळू शकली नव्हती. आता भूषण कुमार (Bhushan Kumar) यांनी पुष्टी केली आहे की, ते दिवंगत नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचा बायोपिक बनवतील (T series fame Bhushan Kumar announces Biopic of Saroj Khan).
सरोज खान बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका होता, ज्यांच्या तालावर हिंदी सिनेमाच्या अनेक दिग्गज कलाकारांनी नृत्य केले. यामध्ये अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, गोविंदा, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, श्रीदेवी अशा अनेक स्टार्सचा समावेश होता. चार दशकांच्या कारकिर्दीत सरोज खान यांनी सुमारे 350चित्रपटातील दीड हजाराहून अधिक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले.
IT’S OFFICIAL.. BHUSHAN KUMAR ANNOUNCES SAROJ KHAN BIOPIC… #BhushanKumar [#TSeries] announces biopic on legendary choreographer #SarojKhan… Further developments will be announced soon. pic.twitter.com/y4rLFepfvK
— taran adarsh (@taran_adarsh) July 3, 2021
80च्या दशकात मिळाली लोकप्रियता
80च्या दशकाच्या उत्तरार्धात श्रीदेवी यांच्या ‘मैं नागीन तू सपेरा’ (नगीना) आणि ‘हवा हवाई’ (मिस्टर इंडिया) गाण्यांवरील कोरिओग्राफीमुळे सरोज खान यांना अधिक लोकप्रियता मिळाली. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सरोज खान यांनी संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ मधील ‘डोला रे डोला’, माधुरी दीक्षित स्टारर ‘तेजाब’ आणि 2007च्या ‘जब वी मेट’मधील ‘ये इश्क’ यासह काही संस्मरणीय गाण्यांची कोरिओग्राफ केली होती.
सलमानकडून मदतीचा हात
सरोज खान या खूप मोठ्या नृत्यदिग्दर्शिका होत्या, परंतु त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली, जेव्हा त्यांना काम मिळणे बंद झाले. याचा खुलासा स्वत: सरोज खान यांनी आपल्या एका मुलाखतीत केला होता. काम नसताना सलमान खानने त्यांना मदत केल्याचे सरोज खान यांनी सांगितले होते. एक दिवस सलमान खान त्याच्या घरी पोहोचला आणि त्यांना विचारले की, सध्या तुम्ही काय करत आहात?
सलमान खानच्या प्रश्नाला उत्तर देताना सरोज खान म्हणाल्या होत्या की, काहीही नाही, मी फक्त काही अभिनेत्रींना नृत्य शिकवत आहे. हे ऐकून सलमानने त्यांना सांगितले की, आतापासून तुम्ही माझ्याबरोबर काम कराल. सरोज खान म्हणाल्या की, सलमान आपल्या बोलण्यावर ठाम आहे हे मला आधीच ठाऊक होते. तथापि, सलमान खान आणि सरोज खान यांच्यातल्या वादविवादाची बातमीही मीडियापासून लपलेली नव्हती. असे म्हटले जाते की, सलमान खानने आपल्याला चित्रपटातून काढून टाकल्याचा आरोप त्यांनी केला होता. कारण सलमानला असे वाटले की, त्याने नृत्यात नेहमीच आमिरला अधिक महत्त्व दिले आहे.
(T series fame Bhushan Kumar announces Biopic of Saroj Khan)
हेही वाचा :
रक्ताने पत्र लिहिलं, पळून जाऊन लग्न ते घटस्फोट, आमिरच्या पहिल्या लग्नाची कहाणी