AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धार्मिक भावना दुखावणे अयोग्यच; ‘तांडव’च्या निर्मात्यांना अंतरिम संरक्षण देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

गेल्या काही दिवसांत 'तांडव' या सिरीज विरोधात अनेक राज्यांमध्ये एफआयआर दाखल झाल्या आहेत. त्यामुळे 'तांडव'च्या निर्मात्यांनी अटकेपासून संरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. | Tandav

धार्मिक भावना दुखावणे अयोग्यच; 'तांडव'च्या निर्मात्यांना अंतरिम संरक्षण देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
'तांडव'च्या निर्मात्यांनी अटकेपासून संरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र, आता न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावल्याने 'तांडव'च्या निर्मात्यांचा पाय आणखीनच खोलात रुतला आहे.
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 4:58 PM

नवी दिल्ली: धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या ‘तांडव’ (Tandav) या वेब सिरीजच्या निर्मात्यांना अंतरिम संरक्षण देण्यास बुधवारी सर्वोच्च न्यायालायने नकार दिला. गेल्या काही दिवसांत ‘तांडव’ या सिरीज विरोधात अनेक राज्यांमध्ये एफआयआर दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ‘तांडव’च्या निर्मात्यांनी अटकेपासून संरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र, आता न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावल्याने ‘तांडव’च्या निर्मात्यांचा पाय आणखीनच खोलात गेला आहे. (You Cannot Hurt Religious Sentiments Supreme Court Refuses Interim Protection To Makers Of Tandav)

‘तांडव’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर, अ‍ॅमेझॉन प्राईम इंडियाच्या प्रमुख अपर्णा पुरोहित, निर्माता हिमांशु मेहरा आणि ‘तांडव’चे लेखक गौरव सोळंकी आणि अभिनेता मोहम्मद झिशान अयुब या सर्वांकडून सर्वोच्च न्यायालयात तीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या तिन्ही याचिकांवर न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती एम.आर. शहा यांच्या खंडपाठासमोर सुनावणी झाली.

त्यावेळी न्यायालयाने या सर्वांना तातडीने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. अटकपूर्व जामीन किंवा गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.  आम्ही कलम 482 CrPC अंतर्गत दिलेल्या अधिकाराचा वापर करु शकत नाही. त्यामुळे आम्ही अंतरिम संरक्षण बहाल करु शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले.

‘तांडव’च्या विरोधात अनेक राज्यांमध्ये गुन्हे

‘तांडव’ ही वेब सिरीज प्रदर्शनापासूनच वादाच्या केंद्रस्थानी आहे. या वेब सिरीजमधील काही संवाद धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे आक्षेप आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये या वेब सिरीजचे निर्माते आणि कलाकारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे प्रकरण तापल्यानंतर ‘तांडव’च्या निर्मात्यांनी सिरीजमधून वादग्रस्त दृश्यं वगळण्याची तयारी दाखवली होती. मात्र, त्यानंतरही तक्रारदारांचे समाधान झालेले नाही.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि कर्नाटक सरकारला ‘तांडव’विरोधातील गुन्हे रद्द करण्याच्या याचिकेवर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.

वाद नेमका कशावरुन पेटला?

या वेब सीरीजमध्ये भगवान शिव आणि भगवान राम यांचा अपमान झाल्याचा आरोप आहे. ‘तांडव’मधील एका दृश्यात ‘नारायण-नारायण. देवा काहीतरी कर. रामजींचे अनुयायी सोशल मीडियावर सतत वाढत आहे’, अशा आशयाचा एक संवाद आहे. या संवादासोबातच, इतर बरेच संवाद देखील वादात अडकले आहेत. हा वाद इतका वाढला की, माहिती व प्रसारण मंत्रालयालाही या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी त्वरित अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या अधिकाऱ्यांना बोलावले. भाजपच्या अनेक नेत्यांनी ‘तांडव’विरोधात आंदोलन करून, वेब सीरीजवर त्वरीत बंदी घालण्याची मागणी केली होती.

संबंधित बातम्या:

अवघ्या विश्वाला हादरवणाऱ्या ‘तांडव’चं नेमकं रहस्य काय? जाणून घ्या महादेवाच्या या निर्मितीबद्दल…

वेब सीरिजचे निर्माते बदल करण्यास तयार, पण त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय ‘तांडव’ थांबणार नाही : राम कदम

(You Cannot Hurt Religious Sentiments Supreme Court Refuses Interim Protection To Makers Of Tandav)

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.