Tanushree Dutta: ‘मला काहीही झालं तर त्याला नाना पाटेकर जबाबदार’, तनुश्री दत्ताच्या पोस्टने खळबळ

अनेक लोक तिला टार्गेट करत असून तिचा छळ केला जात असल्याचा आरोप तनुश्रीने या पोस्टमध्ये केला आहे. इतकंच नव्हे तर तिला काहीही झालं तर त्याला फक्त नाना पाटेकर आणि बॉलिवूड माफिया जबाबदार असतील, असंच तिने थेट म्हटलंय.

Tanushree Dutta: 'मला काहीही झालं तर त्याला नाना पाटेकर जबाबदार', तनुश्री दत्ताच्या पोस्टने खळबळ
तनुश्री दत्ताच्या पोस्टने खळबळ Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 2:35 PM

अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) सोशल मीडियावर पोस्ट लिहित पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिने अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) आणि बॉलिवूड माफियावर (Bollywood Mafia) तिचा छळ केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच तिने इंडस्ट्रीतील काही लोक आणि पत्रकारांवर फेक न्यूज चालवल्याचा आरोपही केला आहे. अनेक लोक तिला टार्गेट करत असून तिचा छळ केला जात असल्याचा आरोप तनुश्रीने या पोस्टमध्ये केला आहे. इतकंच नव्हे तर तिला काहीही झालं तर त्याला फक्त नाना पाटेकर आणि बॉलिवूड माफिया जबाबदार असतील, असंच तिने थेट म्हटलंय. ‘मला कधीही काहीही झालं तर मी #MeToo चे आरोपी नाना पाटेकर, त्यांचे वकील, त्यांचे सहकारी आणि त्यांचे बॉलिवूड माफिया मित्र जबाबदार असतील. कोण आहेत हे बॉलिवूड माफिया? सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ज्यांची नावं पुन्हा पुन्हा समोर आली तीच लोकं’, असं तिने लिहिलंय.

तनुश्रीने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, ‘त्यांचे चित्रपट पाहू नका, त्यांच्यावर पूर्णपणे बहिष्कार टाका. प्रत्येकजण त्यांच्या मागे लागा. त्यांचं आयुष्य नरक बनवा, कारण त्यांनी मला खूप त्रास दिला आहे. कायदा आणि न्यायव्यवस्था जरी अपयशी ठरले असले तरी माझा या महान देशाच्या लोकांवर विश्वास आहे.’ तनुश्रीने तिच्या पोस्टमध्ये तिच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवणाऱ्या पत्रकारांचाही उल्लेख केला आहे.

हे सुद्धा वाचा

तनुश्री दत्ताने 2018 मध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर MeToo चा आरोप केला होता. नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप झाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. तनुश्रीच्या म्हणण्यानुसार, 2009 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर गाण्याच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी तिच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता. तनुश्री दत्ता शेवटची 2010 मध्ये ‘अपार्टमेंट’ या चित्रपटात दिसली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.