Shehnaaz Gill | शहनाज गिल हिच्यावर चाहत्यांचा संपात, नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल
गेल्या कित्येक वर्षांपासून कपिल शर्मा हा त्याच्या शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. विशेष म्हणजे सध्या कपिल त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच कपिल शर्मा हा शहनाज गिल हिच्या शोमध्ये पोहचला होता.
मुंबई : काॅमेडीचा किंग अर्थात कपिल शर्मा (Kapil Sharma) याने आता अभिनय क्षेत्रामध्येही पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे कपिल शर्मा याचा तिसरा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. नुकताच रिलीज झालेल्या चित्रपटामुळे सध्या कपिल शर्मा हा प्रचंड चर्चेत आहे. कपिल शर्मा याचा ज्विगाटो हा चित्रपट 17 मार्च रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाला फक्त भारतामध्येच नाहीतर विदेशातही मोठा प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये बघायला मिळत आहेत. चित्रपट निर्मात्यांसह कपिल शर्मा यालाही या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा नक्कीच आहेत. हा चित्रपट चांगली कामगिरी करताना दिसत आहे.
द कपिल शर्मा या शोमध्ये अनेक बाॅलिवूड कलाकार आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कायम येतात. द कपिल शर्मा शोच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून कपिल शर्मा हा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच कपिल शर्माच्या शोमध्ये सेल्फी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अक्षय कुमार हा पोहचला होता.
अक्षय कुमार याने सेल्फी चित्रपटाचे प्रमोशन मोठ्या प्रमाणात केले. मात्र, अक्षयच्या सेल्फीकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीये. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेलाय. विशेष म्हणजे सेल्फीसह अक्षय कुमार याचे तब्बल पाच चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले आहेत. प्रेक्षक अक्षय कुमार याच्या चित्रपटाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत.
View this post on Instagram
नुकताच कपिल शर्मा हा त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी शहनाज गिल हिच्या शोमध्ये पोहचला होता. बिग बाॅस 13 मधून खरी ओळख शहनाज गिल हिला मिळालीये. विशेष म्हणजे लवकरच शहनाज गिल ही बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सलमान खान याच्या आगामी किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्ये शहनाज गिल महत्वाच्या भूमिकेत आहे.
शहनाज गिल हिच्या शोमध्ये पोहचल्यानंतर शहनाज आणि कपिल शर्मा हे पापाराझी यांना पोझ देताना दिसले. मात्र, यादरम्यान शहनाज गिल ही पापाराझी यांना म्हणताना दिसत आहे की, आता तुम्ही जा…लवकर निघा इथून…हे तीन वेळा शहनाज बोलताना दिसत आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
शहनाज गिल हिचे हे बोलणे तिच्या चाहत्यांना अजिबात आवडले नाहीये. अनेकांनी हा व्हिडीओ बघितल्यानंतर शहनाज गिल हिच्यावर टिका करण्यासही सुरूवात केलीये. एकाने लिहिले की, बाॅलिवूड पदार्पणाच्या अगोदरच गेली का हवा डोक्यात? दुसऱ्याने लिहिले की, हे अत्यंत चुकीचे आहे, कारण त्यांच्यामुळेच तू इतकी जास्त फेमस झालीये. अनेकांना शहनाज गिलचे हे बोलणे पटले नसल्याचे दिसत आहे.