घ्या आता या अभिनेत्रीने केले भगव्या रंगाच्या बिकिनीवर बोल्ड फोटोशूट
चित्रपटामधील बेशर्म रंग हे गाणे हटवण्याची मागणी देखील सातत्याने केली जात आहे.
मुंबई : पठाण या चित्रपटामधील एका गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे मोठा वाद सुरू आहे. इतकेच नाहीतर यामुळे सोशल मीडियावर सतत बायकॉट पठाणची मागणी सुरू आहे. हे सर्व असतानाही शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण आपल्या पठाण चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यामध्ये बिझी आहेत. चित्रपटामधील बेशर्म रंग हे गाणे हटवण्याची मागणी देखील सातत्याने केली जात आहे. हे सर्वकाही सुरू असतानाच आता एका अभिनेत्रीने भगव्या रंगाच्याच बिकिनीमध्ये अत्यंत बोल्ड फोटोशूट केले आहे.
पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यापासून मोठा वाद सुरू आहे. सोशल मीडियावर शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्याबद्दलचा रोष देखील वाढताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे दीपिकाने बेशर्म रंग या गाण्यामध्ये भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे.
View this post on Instagram
आता अभिनेत्री नेहा शर्मा हिने भगव्या रंगाच्या बिकिनीवरच बोल्ड फोटोशूट केले आहे. नेहाचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी हे फोटो पाहून नेहावर टीका करण्यास देखील सुरूवात केलीये.
नेहा शर्मा हिने हे बोल्ड फोटोशूट गोव्याच्या समुद्र किनारी केले आहे. आता नेहाला लोकांच्या रोषाला कशाप्रकारे सामोरे जावे लागते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. नेहा हिने हे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
नेहाच्या फोटोवर कमेंट करताना एका युजर्सने लिहिले की, आता हिला कोण काही बोलणार नाही का? दुसऱ्या युजर्सने लिहिले की, हिने भगव्या रंगाच्या बिकिनीवर का फोटोशूट केले आहे?