जिला सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाला जबाबदार ठरवले जात होते तिने अखेर सोडले माैन, म्हणाली मी आणि शोएब…
फक्त भारतामध्येच नाही तर पाकिस्तानमध्येही यांच्या नावाची चर्चा सतत होती.
मुंबई : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत. फक्त भारतामध्येच नाही तर पाकिस्तानमध्येही यांच्या नावाची चर्चा सतत होती. सानिया आणि शोएब घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. त्यामध्येच सानिया मिर्झा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले होते की, तुटलेले दिल नेमके जातात कुठे? यासोबतच तिने एक फोटोही तुटलेल्या दिलाचा शेअर केला होता. सतत बातम्या होत्या की, सानिया आणि शोएब यांच्या नात्यामध्ये सर्वकाही अलबेल नाहीये.
सानिया आणि शोएब घटस्फोट घेणार असल्याचे त्यांच्या अत्यंत जवळच्या मित्राने सांगितले. सोशल मीडियावरही चाहते सातत्याने या सर्व चर्चा खऱ्या आहेत का? हे प्रश्न सानियाला विचार होते. परंतू यावर सानिया किंवा शोएब यांनी काहीच उत्तर दिले नाही.
सानिया मिर्झाने शोएबचे घर सोडल्याच्या देखील बातम्या सातत्याने येत होत्या. यादरम्यान सोशल मीडियावर शोएबचे एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबतचे काही फोटो तूफान व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून असा अंदाजा लावला जात होता की, या अभिनेत्रीमुळेच सानियाचा संसार तुटला आहे.
ज्या अभिनेत्रीचे नाव शोएबसोबत जोडले जात होते आणि या दोघांचा घटस्फोट होण्यासाठी तिच कारणीभूत असल्याचे बोलले जात होते. त्या अभिनेत्रीने आता यासर्व प्रकरणावरून माैन सोडले असून अखेर तिने शोएबसोबत असलेल्या नात्यावर खुलासा केलाय.
कारण शोएबचे आणि तिचे जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरून तिला प्रचंड ट्रोल केले जात होते. या पाकिस्तानी अभिनेत्रीने नाव आयशा उमर आहे. एका युजर्सने आयेशाला विचारले की, तू शोएब मलिकसोबत लग्न करणार आहेस का?
आयशा या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाली की, अजिबात नाही…शोएबचे अगोदरच लग्न झाले असून तो त्याच्या बायकोसोबत आनंदी आहे. मी कायमच शोएब आणि सानिया यांचा सन्मान करते. मी आणि शोएब फक्त आणि फक्त चांगले मित्र असून आम्ही ऐकमेकांची काळजी करतो.