Ancestral House | दिलीप कुमार-राज कपूर यांचं वडिलोपार्जित घर बनणार म्यूजियम, इतक्या कोटींना संपत्ती विकणार!

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि राज कपूर (Raj Kapoor) यांचे वडिलोपार्जित घर पाकिस्तानात आहेत.

Ancestral House | दिलीप कुमार-राज कपूर यांचं वडिलोपार्जित घर बनणार म्यूजियम, इतक्या कोटींना संपत्ती विकणार!
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 9:52 AM

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि राज कपूर (Raj Kapoor) यांचे वडिलोपार्जित घर पाकिस्तानात आहेत. त्या घराला आता राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा सरकारने या खरेदीस मान्यता दिली आहे. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी त्याला 2.35 कोटी रुपयांच्या खरेदीस औपचारिक मान्यता दिली आहे.(The ancestral home of Dilip Kumar and Raj Kapoor in Pakistan will be museum)

दिलीपकुमार आणि राज कपूर यांच्या वडिलोपार्जित हि हवेली अत्यंत मोठी आहे. या हवेलीला खरेदी केल्यानंतर खैबर पख्तूनख्वाचा पुरातत्व विभाग संग्रहालयात रूपांतरित करणार आहे. पेशावरचे उपायुक्त मोहम्मद अली असगर विभागाच्या अहवालानुसार दिलीपकुमार यांच्या 101 चौरस मीटर घराची किंमत 80.56 लाख रुपये आहे, तर राज कपूर यांचा 151.75 चौरस मीटर घराची किंमत 1.50 कोटी ठरविण्यात आली आहे.

राज कपूरच्या वडिलोपार्जित घराचे नाव कपूर हवेली आहे. हे 1918 आणि 1922 दरम्यान बांधले गेले होते. या हवेलीत राज कपूर आणि त्यांचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्म झाला आहे. जन्मानंतर काही दिवस त्यांचे काही दिवस या हवेलीतच गेले आहेत. ही हवेली राज कपूरचे आजोबा बश्नेश्वरनाथ कपूर यांनी बनविली होती.  हवेली खवानी बाजाराजवळ आहे. दिलीप कुमार यांचे घरही त्याच परिसरात आहे.

ही हवेलीजवळपास 100 वर्षांहून अधिक जुनी आहे. काही दिवसांपूर्वी दिलीप कुमारने आपल्या वडिलोपार्जित घराचे काही फोटो शेअर केले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या पाकिस्तानातील चाहत्यांनाचे धन्यवाद मानले होते. माझ्या वडिलोपार्जित घराचे काही फोटो तुम्ही मला पाठवले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

संबंधित बातम्या : 

Weekend Spl | दीपिका-आलियाने रणथंभोरच्या सुट्टीचा प्लॅन केला? की हा योगायोगच होता?

ड्रग्ज केसमध्ये फसलेल्या अर्जुनसोबत कंगनाची पार्टी, चिडलेल्या प्रेक्षकांची चित्रपटावर बहिष्कार घालण्याची धमकी!

(The ancestral home of Dilip Kumar and Raj Kapoor in Pakistan will be museum)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.