मनी लाँड्रिंग प्रकरणात नाव आल्यानंतर जॅकलिन फर्नांडिससोबत या मोठ्या अभिनेत्याने तोडले नाते…
200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचे नाव आल्यापासून बाॅलिवूडचे स्टार जॅकलिनपासून दोन हात दूरच राहताना दिसत आहेत. तिच्या या वाईट काळात तिच्यासोबत कोणी नसल्याचे स्पष्ट दिसते आहे.
मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) हा जेलमध्ये आहे. मात्र, बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) या प्रकरणी अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तिसऱ्यांदा चाैकशीसाठी जॅकलिनला बोलावले आहे. मागच्या वेळी जॅकलिनची चाैकशी तब्बल नऊ तास झाली. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसलाही आरोपी करण्यात आल्याने बाॅलिवूडमधील (Bollywood) अनेकांना मोठा धक्का बसला. मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनचे नाव आल्यापासून बाॅलिवूडमधील तिच्या खास मित्रांनीही तिच्यापासून एक सुरक्षित अंतर ठेवल्याचे दिसते आहे.
200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचे नाव
200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचे नाव आल्यापासून बाॅलिवूडचे स्टार जॅकलिनपासून दोन हात दूरच राहताना दिसत आहेत. तिच्या या वाईट काळात तिच्यासोबत कोणी नसल्याचे स्पष्ट दिसते आहे. सुकेश चंद्रशेखरसोबत जवळचे संबंध असल्याने जॅकलिनच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. जॅकलिन फर्नांडिस सुकेशसोबत लग्न देखील करणार होती, अशी माहिती मिळत आहे.
जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणींमध्ये मोठी वाढ…
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान नेहमीच वाईट काळात आपल्या मित्रांसोबत उभा असतो. मात्र, जॅकलिनच्या या वाईट काळात तिचा मित्र अर्थात सलमान खान देखील तिच्यापासून सुरक्षित अंतर ठेवू असल्याची माहिती मिळतेय. जॅकलिन आणि सलमान खान खूप चांगले मित्र आहेत. मात्र, सलमान खानला कोणत्याच कायदेशीर बाबींमध्ये अडकायचे नसल्याने तो यासर्व प्रकरणापासून दूर आहे.