मुंबई : बॉलिवूडचं स्टार कपल आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकत्र दिसत आहेत. दोघेही एकमेकांना प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतात, त्यामुळे चाहत्यांनाही दोघांची जोडी खूप आवडते. आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दोघांचे एकमेकांसाठीचे क्यूट हावभाव चाहत्यांची मने जिंकतात. असाच काहीसा प्रकार गुरुवारी घडला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गुरुवारी रणबीर कपूर आलिया भट्ट आणि तिची बहीण शाहीनसोबत डिनरसाठी गेला होता. आलिया आणि रणबीरचे अनेक व्हिडीओ रेस्टॉरंटच्या बाहेरून समोर आले होते. या डिनर पार्टीला दोघांचे अनेक मित्रही सहभागी झाले होते.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत. आलिया प्रथम तिची बहीण शाहीनला त्यांच्या कारमध्ये सोडण्यासाठी जाते. यावेळी आलियाने शाहीनचा हात पकडला आहे. कारमध्ये बसण्यापूर्वी दोन्ही बहिणी एकमेकांना मिठी मारतात.
शाहीनला सोडल्यानंतर आलिया तिच्या कारकडे जाते. यादरम्यान आलियाच्या आजूबाजूला खूप गर्दी होते आणि ते पाहून लगेचच रणबीर कपूर तिच्याजवळ येतो आणि तिला प्रोटेक्ट करत कारच्या दिशेने घेऊन जातो.
व्हिडीओमध्ये आलियाने पिवळ्या रंगाचा वन-शोल्डर सिक्वेन्स ड्रेस परिधान केला आहे. ज्याच्या सोबत तिने पांढरे शूज परिधान केले होते आणि पोनीटेल बांधली होती. यासोबतच तिने एक पर्सही कॅरी केली होती. दुसरीकडे, रणबीर कपूरबद्दल सांगायचे तर, त्याने काळ्या टी-शर्टसह बीन कलरचे जॅकेट आणि ब्लू डेनिम परिधान केले होते.
आलिया, रणबीर आणि शाहीन त्यांच्या मैत्रिणी अनुष्का रंजन, आकांक्षा रंजन आणि मेघना गोयलसोबत डिनरला गेले होते.
हवाई सफारीमध्ये हरवून जा भारतीय संगितात, विमानतळावरही ऐकू येईल अभिजात भारतीय संगीत!
शिवराज अष्टकातील तिसरं पान उलगडणार बाजीप्रभूंचा इतिहास! ‘पावनखिंड’ मध्ये पुन्हा चिन्मय शिवरायरूपात!