पठाण चित्रपटाच्या निर्मात्याची मोठी खेळी, ‘शहजादा’ला बसणार फटका, वाचा काय घडले?

पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा वाद निर्माण झाली होता. सतत या चित्रपटावर बहिष्कार सोशल मीडियावर टाकला जात होता. मात्र, या वादाचा फायदा प्रत्यक्षात चित्रपटाला झाल्याचे दिसते.

पठाण चित्रपटाच्या निर्मात्याची मोठी खेळी, 'शहजादा'ला बसणार फटका, वाचा काय घडले?
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 7:16 PM

मुंबई : शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्सवर रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी करतोय. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर नोंदवले आहेत. विशेष म्हणजे पठाण हा चित्रपट शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील ठरला आहे. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट सुरूवातीपासून बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. कारण पठाणच्या माध्यमातून शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. चाहत्यांमध्ये पठाण चित्रपटाविषयी सुरूवातीपासूनच मोठी क्रेझ होती. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाका करत रिलीजच्या पहिल्याच दिवशी अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले. ओपनिंग डेला चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तब्बल जगभरातून 100 कोटींची कमाई केली. शाहरुख खान याचा पठाण (Pathaan)  हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज झाला. आता 17 फेब्रुवारी असून अजूनही चित्रपटाची जादू बाॅक्स आॅफिसवर कायम आहे. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा वाद निर्माण झाली होता. सतत या चित्रपटावर बहिष्कार सोशल मीडियावर टाकला जात होता. मात्र, या वादाचा फायदा प्रत्यक्षात चित्रपटाला झाल्याचे दिसते.

पठाण चित्रपटाती बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वादाला तोंड फुटले होते. चित्रपटाच्या विरोधात बजरंग दल आक्रमक झाले होते. यादरम्यान काही थिएटर मालकांनाही नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या.

पठाण चित्रपटाला रिलीज होऊन 23 दिवस झाले आहेत आणि चित्रपटाने जगभरातून तब्बल 976 कोटींची कमाई केलीये. नुकताच आज कार्तिक आर्यन याचा शहजादा हा चित्रपट रिलीज झालाय. मात्र, पठाण चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटाला फटका बसू शकतो.

View this post on Instagram

A post shared by Yash Raj Films (@yrf)

पठाण चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज 17 फेब्रुवारी रोजी चित्रपटाच्या तिकिटाच्या दरामध्ये मोठी कपात केलीये. आज पठाण हा चित्रपट 110 रूपयांमध्ये बघता येणार आहे. विशेष म्हणजे आता अजून एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. याचाही मोठा फटका शहजादा चित्रपटाला बसण्याची शक्यता आहे.

YRF ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, शनिवार आणि रविवार पठाण चित्रपटाच्या तिकीटाची किंमत फक्त 200 रुपये असेल. देशभरात हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत केवळ 200 रुपयांमध्ये या चित्रपटाचा आनंद लोकांना घेता येणार आहे. यामुळे आता शहजादा चित्रपटाला फटका बसण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.