Actress | ‘या’ फेमस अभिनेत्रीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी
संतोख सिंह सुख हे त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे ओळखले जातात. इतकेच नाही तर शहनाजला बिग बॉसच्या घरात भेटायला आल्यावरही त्यांनी मागचा पुढचा विचार न करताना पारसवर टीका केली होती.
मुंबई : बिग बॉसमधून (Bigg Boss) खरी ओळख मिळालेली अभिनेत्री अर्थात शहनाज गिलसंबंधित एक अत्यंत मोठी बातमी पुढे येतंय. शहनाजचे वडील संतोख सिंह सुख यांना जीवे मारण्याची धमकी (Threat) देण्यात आलीये. एका विदेशी नंबरवरून त्यांना फोन आला होता आणि सुरूवातीला शिव्या देण्यात आल्या आणि दिवाळीच्या अगोदर जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. या सर्व प्रकरणानंतर संतोख सिंह सुख यांनी पोलिसात (Police) तक्रार दाखल केलीये.
संतोख सिंह सुख हे त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे ओळखले जातात. इतकेच नाही तर शहनाजला बिग बॉसच्या घरात भेटायला आल्यावरही त्यांनी मागचा पुढचा विचार न करताना पारसवर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी सिध्दार्थ आणि शहनाजची जोडी लोकांना प्रचंड आवडत असल्याचे देखील सर्वांसमोर सांगितले होते. शहनाजचे वडील कायमच चर्चेत असतात.
शहनाज गिलच्या वडिलांवर यापूर्वीही हल्ला करण्यात आला होता. दोन दुचाकीस्वार यांनी कारजवळ येत गोळीबार केला होता. शहनाज गिल सलमान खानच्या एका चित्रपटात लवकरच दिसणार आहे. गेल्या काही वर्षांपासून शहनाज गिलच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झालीये. सिध्दार्थ शुक्लाचे चाहते देखील शहनाज गिलला सपोर्ट करतात. अत्यंत कमी वेळेमध्ये शहनाजने स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीये.