शाहरुख खान याच्या पठाणला टाकले मागे, ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचा धमाका सुरूच
द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे द केरळ स्टोरी हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहे. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे तोडले आहेत. बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण चित्रपट रिलीज झाला होता.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले. द केरळ स्टोरी हा चित्रपट 5 मे रोजी रिलीज झालाय. मुळात म्हणजे चित्रपटाचा टिझर रिलीज (Teaser release) झाल्यापासूनच चित्रपटावर सतत बंदी घालण्याची मागणी केली जात होती. शेवटी मोठ्या वादानंतर चित्रपट (Movie) रिलीज झाला. मात्र, चित्रपट रिलीज झाल्यानंतरही वाद कमी होण्याचे नाव घेत नाहीये. दोन राज्यांमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आलीये. चित्रपटावर बंदी घातल्यानंतर निर्मात्यांनी थेट कोर्टात धाव घेतली. राज्य सरकार चित्रपटावर बंदी घालू शकत नसल्याचे थेट निर्मात्यांनी म्हटले.
काही दिवसांपूर्वीच या प्रकरणात कोर्टात सुनावणी झाली असून 17 तारखेला या संदर्भात सुनावणी आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्यांना असा विश्वास आहे की, कोर्टाचा निकाल हा त्यांच्या बाजूनेच लागेल. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय. शाहरुख खान याच्या या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवरील अनेक रेकाॅर्ड हे तोडले आहेत.
शाहरुख खान याच्या चित्रपटाचा रेकाॅर्ड हा नुकताच द केरळ स्टोरी चित्रपटाने तोडला आहे. द केरळ स्टोरी हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाला एकीकडे विरोध होताना दिसत आहे तर दुसरीकडे प्रेक्षकांचे जबरदस्त असे प्रेम मिळताना दिसत आहे. चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहे.
द केरळ स्टोरी चित्रपट रिलीज झाल्यानंतर 10 व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या रविवारी कमाईमध्ये पठाण चित्रपटाला द केरळ स्टोरी चित्रपटाने मागे टाकले आहे. 10 व्या दिवशी पठाण चित्रपटाने जगभरातून 13 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले होते. तर द केरळ स्टोरी चित्रपटाने 23. 25 कोटींचे कलेक्शन हे केले आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे.
पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर देखील मोठ्या वादाला तोंड फुटले होते. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर अनेकांनी थेट या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. तर द केरळ स्टोरी चित्रपटाचे टिझर रिलीज झाल्यानंतर देखील मोठा वाद निर्माण झाला. द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत अनेकांनी थेट कोर्टात धाव देखील घेतली होती.