नाराज भारतीयांना ऑस्करचे सुख मिळवून देणाऱ्या संध्या सुरी आहेत तरी कोण?

'लापता लेडीज' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर भारतीयांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र एका दिग्दर्शिका तथा लेखिकेमुळे भारतीयांची नाराजी दूर झाली आहे. कोण आहे ही लेखिका?

नाराज भारतीयांना ऑस्करचे सुख मिळवून देणाऱ्या संध्या सुरी आहेत तरी कोण?
Follow us
| Updated on: Dec 18, 2024 | 4:01 PM

इंडो-ब्रिटिश चित्रपट निर्मात्या संध्या सुरी यांचा हिंदी चित्रपट ‘संतोष’ ऑस्करने ‘आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’ श्रेणीत निवडला आहे. म्हणजे भारताची गोष्ट जगासमोर मांडणारा हा चित्रपट ‘ऑस्कर’ जिंकू शकतो.

‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर भारतीयांनी नाराजी व्यक्त केली होती. यंदा ऑस्करमध्ये भारताचे नाव येणार की नाही यामुळे सर्वांनाच उत्सुकता होती. ‘लापता लेडीज’ सोबत असलेला चित्रपट ‘संतोष’ वर भारतीयांच्या नजरा खिळल्या होत्या. मात्र एका दिग्दर्शिका तथा लेखिकेमुळे भारतीयांची नाराजी दूर झाली आहे.

ऑस्कर 2025 मध्ये एका हिंदी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. ही आमीर खान प्रोडक्शनच्या लापता लेडीज लिस्टमधून बाहेर पडल्यानंतर यूकेमधल्या प्रोडक्शन हाऊसनं बनवलेला हिंदी चित्रपट ‘संतोष’नं स्थान मिळवलं आहे. संतोष हा ब्रिटननं बनवलेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटाला ऑस्कर 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपट कॅटेगरीत स्थान मिळालं आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका तथा लेखिका आहेत संध्या सुरी.

कोण आहेत संध्या सुरी?

संध्या सुरी दिग्दर्शिका तथा लेखिका तसेच त्या एक ब्रिटिश-भारतीय चित्रपट निर्मातादेखील आहे. त्यांचे वडील यशपाल सुरी यांचा जन्म भारतात झाला. त्यांचे वडील ब्रिटनमधील टीसाइड येथे काम करण्यासाठी भारतातून तिकडे शिफ्ट झाले होते आणि त्यानंतर त्यांनी ब्रिटनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. संध्याचा जन्म लंडनमध्ये झाला. गणिताची पदवी घेतल्यानंतर संध्याने काही वर्षे जपानमध्ये शिक्षिका म्हणूनही काम केलं. मात्र डॉक्युमेंटरी बनवण्याची त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी इंग्लंडच्या नॅशनल फिल्म अँड टेलिव्हिजन स्कूलमध्ये याचे प्रशिक्षण घेतले.

संध्या स्वतःचे चित्रपट स्वत: लिहिते

संध्या यशस्वी लेखिका आणि दिग्दर्शिका देखील आहेत. त्यांच्या बहुतेक चित्रपटांच्या स्क्रिप्ट त्यांनी स्वतःच लिहिल्या आहेत. चित्रपटांसोबतच संध्याला माहितीपट बनवण्याचीही आवड आहे. 2005 मध्ये त्यांनी बनवलेल्या ‘I for India’ या डॉक्युमेंटरीची सर्वांनी खूप प्रशंसाही केली होती. याला सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रँड ज्युरी पारितोषिक मिळालं.

2018 मध्ये, हरियाणातील एका महिला शेतकऱ्याच्या आयुष्याकडून प्रेरित होऊन संध्याने ‘द फील्ड’ हा लघुपट बनवला होता. ब्रिटिश इंडिपेंडंट फिल्म अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म आणि लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी त्याला नामांकनही मिळालं होतं, तर तिच्या चित्रपटाला ‘बेस्ट शॉर्ट’साठी नामांकनही मिळालं होतं. टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलं.

‘संतोष’ मध्ये शहाना गोस्वामी दिसणार आहे

संध्या सुरीच्या ‘संतोष’मध्ये शहाना गोस्वामी महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. 2012 मध्ये एका 23 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर झालेल्या निदर्शनांदरम्यान जमावाच्या विरोधात उभ्या असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याचे चित्र पाहून संध्या सुरी यांना हा चित्रपट बनवण्याची प्रेरणा मिळाली.

ही कथा आपल्या देशाची असूनही उत्तर भारतात चित्रित झालेला ‘संतोष’ हा हिंदी चित्रपट ऑस्करमध्ये ब्रिटनचे प्रतिनिधित्व करेल कारण इंडो-ब्रिटिश चित्रपट निर्मात्या संध्या सुरी यांनी हा चित्रपट बनवला आहे. संध्या या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आणि लेखिका आहेत.

लापता लेडीज’ला मागे टाकून, ‘संतोष’ चित्रपटाची ऑस्करमध्ये एन्ट्री

संध्यासोबत हा चित्रपट बनवणारे प्रोडक्शन हाऊस देखील ब्रिटनचे आहे आणि त्यामुळे हा चित्रपट भारतातून नव्हे तर ब्रिटनमधून ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. आता आमिर खानच्या ‘लापता लेडीज’ला मागे टाकून, संध्याच्या ‘संतोष’ चित्रपटाने अकादमीच्या ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ श्रेणीच्या टॉप 15 यादीत स्थान मिळवले आहे.

हा चित्रपट भारतातून नव्हे तर ब्रिटनमधून जरी पाठवण्यात आला असला तरी संध्या सुरी या भारतीय असल्याने या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना पण त्या भारतीय म्हणूनच त्यांचे नाव येणार असल्याने भारतीयांना तेवढंच समाधान आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.