The Kashmir Files: ‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईत लक्षणीय वाढ; दुसऱ्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला
विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी दणक्यात कमाई केली. पहिल्या दिवसाच्या तुलनेत या चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्या दिवशी तब्बल 139% वाढ झाली.
विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी दणक्यात कमाई केली. पहिल्या दिवसाच्या तुलनेत या चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्या दिवशी तब्बल 139% वाढ झाली. 11 मार्च रोजी ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अनुपम खेर (Anupam Kher), दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट IMDb रेटिंग्जमध्येही अव्वल ठरला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हापासून त्याची सोशल मीडियावर चर्चा झाली. स्पेशल स्क्रिनिंगमध्ये प्रेक्षकांचे डोळे पाणावले होते. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यामुळे चित्रपटाची माऊथ पब्लिसिटीही चांगली झाली आहे. या सर्वांचा सकारात्मक परिणाम बॉक्स ऑफिसच्या कमाईवर झाला.
‘द काश्मीर फाईल्स’ने शनिवारी 8.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवशी 3.55 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी 8.50 कोटी रुपयांची कमाई करत या चित्रपटाने दोन दिवसांत 12.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. देशातील निवडक थिएटर्समध्येच हा चित्रपट प्रदर्शित होऊनसुद्धा केलेली कमाई ही खूपच सकारात्मक असल्याचं मत चित्रपट व्यापार विश्लेषकांनी नोंदवलं आहे.
#TheKashmirFiles is SENSATIONAL, biz more than doubles on Day 2… Registers 139.44% growth, HIGHEST EVER GROWTH [Day 2] *since 2020*… East, West, North, South, #BO is on … This film is UNSTOPPABLE… Fri 3.55 cr, Sat 8.50 cr. Total: ₹ 12.05 cr. #India biz… FANTASTIC! pic.twitter.com/GHS5RqP7dS
— taran adarsh (@taran_adarsh) March 13, 2022
‘बॉक्स ऑफिस इंडिया डॉटकॉम’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाला विशेषत: गुजरातमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई दिल्ली आणि पूर्व पंजाबमध्येही चांगली कमाई झाली असून हळूहळू चित्रपट इतर क्षेत्रांमध्येही पुढे जात आहे. या प्रतिसादामुळे स्क्रीन्सची संख्याही वाढवली जात आहे. फक्त गुजरातमध्येच रविवारची कमाई ही एक कोटींपेक्षा जास्त होऊ शकेल, असा अंदाज आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ची हीच गती टिकून राहिली तर कोरोना महामारीनंतरचा हा सर्वांत हिट चित्रपट ठरेल, असंही म्हटलं जात आहे.
या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबतच पल्लवी जोशी, प्रकाश बेलवाडी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, भाषा सुंबळी, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वी सरनाविक यांसारख्या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. विस्थापितांचं दु:ख मांडणाऱ्या या चित्रपटाने IMDb रेटिंग्जमध्ये मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकलं आहे. IMDb वर 10 पैकी 10 रेटिंग्ज मिळणं सोपं नसतं. एखादा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला असेल तरच त्याला चांगली रेटिंग मिळते. ‘द काश्मीर फाईल्स’ला मिळालेली 10/10 IMDb रेटिंग्ज ही प्रेक्षकांकडून मोठी पोचपावती आहे, असं म्हणायला हरकत नाही.
हेही वाचा:
‘इंडियन आयडॉल 12’ फेम पवनदीप-अरुणिता कायद्याच्या कचाट्यात; वाचा काय आहे नेमकं प्रकरण?
आधी ‘झुंड’वर ‘पावनखिंड’ भारी, आता ‘द काश्मीर फाईल्सनं’ दाबलं, IMDb रेटिंग्ज पाहिलात का?