‘द काश्मीर फाईल्स’ची IMDb रेटिंग अचानक घसरली; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी व्यक्त केला संताप

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट शुक्रवारी (11 मार्च) प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही दणक्यात कमाई सुरू आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

'द काश्मीर फाईल्स'ची IMDb रेटिंग अचानक घसरली; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी व्यक्त केला संताप
Vivek Agnihotri Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 7:06 PM

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट शुक्रवारी (11 मार्च) प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही दणक्यात कमाई सुरू आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर पहिल्या तीन दिवसांची कमाई 26 कोटी रुपये झाली आहे. फक्त प्रेक्षकच नव्हे तर अक्षय कुमार, कंगना रणौत, परिणीती चोप्रा, आर माधवन, परेश रावल यांसारख्या सेलिब्रिटींकडूनही चित्रपटाचं कौतुक होतंय. या चित्रपटाला 10 पैकी 10 IMDb रेटिंग मिळाली होती. सिनेरसिकांनी केलेल्या व्होटिंगवरून ही रेटिंग ठरवली जाते. मात्र 10 वरून ही रेटिंग आता 8.3 वर येऊन पोहोचली आहे. IMDb ही प्रेक्षकांचे रिव्ह्यूज सांगणारी लोकप्रिय वेबसाइट आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटासाठी त्यांनी रेटिंग मोजण्याची पद्धत बदलली आहे. IMDb रेटिंग पेजवरून याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

व्होटिंगमध्ये आढळली असमानता

‘द काश्मीर फाईल्सच्या व्होटिंग अॅक्टिव्हिटीमध्ये असमानता असल्याचं आमच्या रेटिंग यंत्रणेला आढळलं आहे. आमच्या रेटिंग सिस्टिमची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी आम्ही एक पर्यायी मार्ग अवलंबला आहे’, असं IMDb कडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या 135,000 मतांसह ‘द काश्मीर फाईल्स’ला 8.3 इतकी रेटिंग मिळाली आहे. 94% लोकांनी चित्रपटाला 10 रेटिंग दिलं आहे, तर 4% लोकांनी 1 रेटिंग दिलंय. जेव्हा मतदानात असमानता आढळते, तेव्हा आमच्या सिस्टमची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी पर्यायी मार्ग लागू केला जाऊ शकतो, असं स्पष्टीकरण या वेबसाईटकडून देण्यात आलं आहे.

IMDb

आयएमडीबी रेटिंग अचानक घटल्याची बाब एका चाहत्याने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर हे अनैतिक असल्याची प्रतिक्रिया अग्निहोत्रींनी दिली.

IMDb रेटिंग म्हणजे काय? ती का महत्त्वाची?

आयएमडीबी म्हणजेच इंटरनेट मुव्ही डेटाबेस. आयएमडीबी हा ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून त्यावर चित्रपट पाहणारे रसिकप्रेक्षक आपल्या रेटिंगद्वारे एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवतात. या प्लॅटफॉर्मवर स्टार्स पद्धतीने रेटिंग दिलं जातं. 10 हे सर्वाधिक रेटिंग असून चित्रपट, मालिका, वेब सीरिज, व्हिडीओ गेम्स अशा विविध गोष्टींना इथं रेटिंग देता येतं. आयएमडीबीचं रेटिंग जितकं अधिक तितका तो चित्रपट, मालिका किंवा वेब सीरिज लोकांना भावल्याची पोचपावती असते.

1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचं घर सोडावं लागलं होतं. यामध्ये अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

हेही वाचा:

‘द काश्मीर फाईल्स’च्या पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्रींविरोधात काढण्यात आला फतवा

नेमकं कुठे बिनसलं? आमिरने सांगितलं रिना, किरण रावसोबतच्या घटस्फोटांमागील कारण

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.