आधी ‘झुंड’वर ‘पावनखिंड’ भारी, आता ‘द काश्मीर फाईल्सनं’ दाबलं, IMDb रेटिंग्ज पाहिलात का?

अनुपम खेर, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट IMDb रेटिंग्जमध्ये अव्वल ठरला आहे. विस्थापितांचं दु:ख मांडणाऱ्या या चित्रपटाने IMDb रेटिंग्जमध्ये मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकलं आहे.

आधी 'झुंड'वर 'पावनखिंड' भारी, आता 'द काश्मीर फाईल्सनं' दाबलं, IMDb रेटिंग्ज पाहिलात का?
The Kashmir FilesImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 1:33 PM

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट 11 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. एका ऐतिहासिक घटनेवर या चित्रपटाची कथा आधारित आहे. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचं घर सोडावं लागलं होतं. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची ही हृदयद्रावक कथा आहे. अनुपम खेर, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट IMDb रेटिंग्जमध्ये अव्वल ठरला आहे. विस्थापितांचं दु:ख मांडणाऱ्या या चित्रपटाने IMDb रेटिंग्जमध्ये मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकलं आहे. IMDb वर 10 पैकी 10 रेटिंग्ज मिळणं सोपं नसतं. एखादा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला असेल तरच त्याला चांगली रेटिंग मिळते. ‘द काश्मीर फाईल्स’ला मिळालेली 10/10 IMDb रेटिंग्ज ही प्रेक्षकांकडून मोठी पोचपावती आहे, असं म्हणायला हरकत नाही.

IMDb रेटिंग म्हणजे काय? ती का महत्त्वाची?

आयएमडीबी म्हणजेच इंटरनेट मुव्ही डेटाबेस. आयएमडीबी हा ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून त्यावर चित्रपट पाहणारे रसिकप्रेक्षक आपल्या रेटिंगद्वारे एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवतात. या प्लॅटफॉर्मवर स्टार्स पद्धतीने रेटिंग दिलं जातं. 10 हे सर्वाधिक रेटिंग असून चित्रपट, मालिका, वेब सीरिज, व्हिडीओ गेम्स अशा विविध गोष्टींना इथं रेटिंग देता येतं. आयएमडीबीचं रेटिंग जितकं अधिक तितका तो चित्रपट, मालिका किंवा वेब सीरिज लोकांना भावल्याची पोचपावती असते.

‘पावनखिंड’, ‘झुंड’नंतर आता ‘द काश्मीर फाईल्स’

गेल्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर ‘पावनखिंड’ आणि ‘झुंड’ या चित्रपटांची जोरदार चर्चा झाली. बांदल सेना आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या कर्तृत्वावर आधारित ‘पावनखिंड’ या चित्रपटाला 9.5/10 IMDb रेटिंग्ज मिळाली. तर ‘झुंड’ला मिळालेली रेटिंग 9.3/10 इतकी आहे. या दोन्ही चित्रपटांवर विवेक अग्निहोत्रींचा ‘द काश्मीर फाईल्स’ भारी पडला आहे. सुमारे 19,000 लोकांनी IMDb वर चित्रपट प्रदर्शित होताच 24 तासांच्या आत मत नोंदवलं आहे. 10/10 रेटिंग्जसह ‘द कश्मीर फाइल्स’च्या IMDb रेटिंगने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकलं आहे.

अनुपम खेर यांची प्रतिक्रिया

‘जनता जनार्दनचं प्रेम.. त्यांचा आशीर्वाद.. त्यांचे अश्रू.. आमच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला हळूहळू पुढे नेतंय. भगवान के घर मे देर है, अंधेर नहीं,’ अशा शब्दांत अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली. अनुपम खेर यांच्यासोबतच पल्लवी जोशी, प्रकाश बेलवाडी, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, भाषा सुंबळी, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वी सरनाविक यांसारख्या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

हेही वाचा: 

प्रभासला ‘द काश्मीर फाइल्स’ची जोरदार टक्कर; निवडक शो असूनही चांगली कमाई

आठवणीही नकोत; समंथाने नाग चैतन्यला परत केली लग्नातली साडी?

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.