‘ट्रकमध्ये सीटच्या मागे लपून पळालो होतो’; The Kashmir Files पाहून अभिनेत्रीने सांगितला मन हेलावणारा अनुभव

'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने (Vivek Agnihotri) काश्मिरी पंडितांचं दु:ख मांडलं. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या.

'ट्रकमध्ये सीटच्या मागे लपून पळालो होतो'; The Kashmir Files पाहून अभिनेत्रीने सांगितला मन हेलावणारा अनुभव
Sandeepa DharImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 4:51 PM

‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने (Vivek Agnihotri) काश्मिरी पंडितांचं दु:ख मांडलं. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या. तर काहींनी त्या भयाण वास्तवाच्या आठवणी सांगितल्या. असाच एक दु:खद अनुभव अभिनेत्री आणि डान्सर संदिपा धर (Sandeepa Dhar) हिने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून सांगितला. संदिपा ही सुद्धा काश्मिरी पंडित आहे. ‘ही तर माझीच कहाणी आहे’, असं सांगत संदिपाने काश्मीरमधून कशापद्धतीने तिच्या कुटुंबाला पलायन करावं लागलं, याबद्दल पोस्टमध्ये लिहिलं. संदिपाच्या कुटुंबीयांनाही रातोरात काश्मीर सोडावं लागलं होतं.

काय आहे संदिपाची पोस्ट?

‘ज्या दिवशी काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडून जाण्यास सांगितलं होतं, तेव्हा माझ्या कुटुंबानेही मातृभूमी सोडण्याचा निर्णय घेतला होता. एका ट्रकमध्ये माझ्या वडिलांच्या सीटच्या मागे, त्यांच्या पायांच्या मागे लपलो मी आणि माझी चुलत बहीण लपून बसलो होतो. मी काश्मीर फाइल्समध्ये ते अस्वस्थ करणारे दृश्य पाहिल्यानंतर माझं मन हेलावून गेलं. ही पूर्णपणे माझी स्वतःची कहाणी आहे. आपल्या घरी, आपल्या काश्मीरला परत जाण्याची वाट पाहत माझ्या आजीने प्राण सोडले. हा चित्रपट म्हणजे एक जोरदार मुक्का मारणारा आहे. चित्रपट पाहिल्यानंतर माझे पालक पीटीएसडी (पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) अनुभवत आहेत. ही सर्वात महत्वाची कथा आहे जी सांगण्यासाठी बराच वेळ लागला आणि लक्षात ठेवा हा तर केवळ चित्रपट आहे. आम्हाला अजूनही न्याय मिळाला नाही. जगाला सत्य दाखवण्यासाठी विवेक अग्निहोत्री तुमचे खूप खूप आभार,’ असं तिने लिहिलं.

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने अवघ्या सात दिवसांस 90 कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने नवा विक्रम रचला आहे. यामध्ये अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार यांच्यासह इतरही नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत.

हेही वाचा:

The Kashmir Filesची आठवडाभराची कमाई; 100 कोटींच्या क्लबमध्ये होणार सहभागी

‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना Y दर्जाची सुरक्षा

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.