थिएटरचा AC बंद पडला की मॅनेजरनं जाणीवपुर्वक ‘द काश्मीर फाईल्स’ बंद केला? नोएडात सिनेमा बघता बघता हिंदू-मुस्लिम वाद
'द काश्मीर फाईल्स'च्या शो दरम्यान गोंधळा झाला. यावेळी 'भारत माता की जय''जय श्रीराम', अश्या घोषणा देण्यात आल्या.
मुंबई : ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) बघण्यासाठी सध्या मोठी गर्दी होताना पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी शो हाऊसफुल आहेत. अश्यात सिनेमा बघत असताना थिएटरमध्ये हिंदू-मुस्लिम वाद (Hindu-Muslim Controversy) निर्माण झालाय. थिएटर प्रेक्षकांनी भरलेलं असताना अचानकपणे सिनेमा थांबवण्यात आल्याचं सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या लोकांचं म्हणणं आहे. त्यातून मोठा वाद निर्माण झाला. थिएटरचे मॅनेजर एजाज खान यांनी जाणिवपूर्वक चित्रपट थांबवला असा आरोप काही हिंदू संघटनानी लावला. वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. एसी बंद पडल्यामुळे शो बंद करण्यात आला आसल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर पुन्हा चित्रपट सुरू करण्यात आला. हा सगळा प्रकार दिल्ली जवळच्या नोएडा भागातल्या GIP मॉलमध्ये काल संध्याकाळच्या सुमारास घडला.
थिएटरमध्ये हिंदू मुस्लिम वाद
नोएडा भागातल्या GIP मॉलमधल्या थिएटरमध्ये काल संध्याकाळच्या सुमारास हिंदू मुस्लिम वाद निर्माण झाला. थिएटर प्रेक्षकांनी भरलेलं असताना अचानकपणे सिनेमा थांबण्यात आल्याचं सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या लोकांचं म्हणणं आहे. त्यातून मोठा वाद निर्माण झाला. थिएटरचे मॅनेजर एजाज खान यांनी जाणिवपूर्वक चित्रपट थांबवला असा आरोप काही हिंदू संघटनानी लावला. वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर पुन्हा चित्रपट सुरू करण्यात आला.
थिएटरमध्ये गोंधळ
‘द काश्मीर फाईल्स’च्या शो दरम्यान गोंधळा झाला. यावेळी ‘भारत माता की जय”जय श्रीराम’, अश्या घोषणा देण्यात आल्या.
#TheKashmiriFiles #KashmiriHindus @AnupamPKher @vivekagnihotri @myogioffice @narendramodi Reactions of the audience post watching the kashmir files in Wave cinemas Noida. pic.twitter.com/OC8nq76Z7T
— Navin Chhetri (@Navinchhetri1) March 13, 2022
खराब प्रिंटमुळे प्रेक्षक भडकले
उत्तर प्रदेशमधल्या अलीगढमध्येही ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाच्या शो दरम्यानही गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं. अलीगढच्या सीमा टॉकिजमध्ये सिनेमाची प्रिंट खराब असल्याने प्रेक्षकांनी गोंधळ घातला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. काही वेळातच शो पुन्हा सुरू करण्यात आला.
संंबंधित बातम्या