‘द काश्मीर फाईल्स’च्या पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्रींविरोधात काढण्यात आला फतवा

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. विवेक आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांच्याविरोधात शूटिंगच्या शेवटच्या दिवशी फतवा काढण्यात आला.

'द काश्मीर फाईल्स'च्या पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्रींविरोधात काढण्यात आला फतवा
The Kashmir Files Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 12:43 PM

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. विवेक आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांच्याविरोधात शूटिंगच्या शेवटच्या दिवशी फतवा काढण्यात आला. खुद्द पल्लवी यांनी याविषयीची माहिती दिली. पल्लवी या चित्रपटाच्या निर्माती आहेत आणि त्यांनी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकासुद्धा साकारली आहे. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचं घर सोडावं लागलं होतं. यामध्ये अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

शूटिंगदरम्यान आलेल्या अडचणी

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट जरी कमी बजेटमध्ये आणि मोजक्या प्रमोशन्सच्या आधारावर बनवण्यात आला असला तरी बॉक्स ऑफिसवर त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पल्लवी यांनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलेल्या आव्हानांबद्दल सांगितलं. ‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “शूटिंग हा संपूर्ण प्रवासातील खूप छोटा भाग होता. कथेसाठी केलेला रिसर्च, लोकांशी बोलणं, चित्रपटासाठी पैसा मिळवणं, कलाकारांना शोधणं हे सर्वकाही खूप आव्हानात्मक होतं.”

काश्मीरमध्ये चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी पल्लवी आणि विवेक अग्निहोत्रींविरुद्ध फतवा काढण्यात आला होता, असं त्यांनी पुढे सांगितलं. “शूटिंग हा सर्वांत सोपा भाग होता. आम्ही या चित्रपटाला समर्पित केलेल्या चार वर्षांमध्ये शूटिंगला फक्त एक महिना लागला. आम्ही काश्मीरमध्ये शूटिंग करत असताना आमच्या नावावर फतवा निघाला. जेव्हा फतवा काढण्यात आला तेव्हा आम्ही सुदैवाने शेवटच्या सीनचं शूटिंग करत होतो. मी विवेकला म्हणाले, “चला पटकन हा सीन पूर्ण करून विमानतळाकडे जाऊ. आता काही बोलू नको, आधी आपण शूट पूर्ण करू.” कारण आम्हाला त्याठिकाणी जाण्याची दुसरी संधी मिळणार नव्हती. आम्ही आधी तो सीन पूर्ण केला आणि मी काही लोकांना हॉटेलमध्ये पाठवलं. त्यांना पॅकिंग करून तिथून निघण्यास सांगितलं. शूटिंग करताना हे सर्वांत मोठं आव्हान आमच्यासमोर होतं”, असं पल्लवी म्हणाल्या.

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने 27.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. देशातील निवडक थिएटर्समध्येच हा चित्रपट प्रदर्शित होऊनसुद्धा केलेली कमाई ही खूपच सकारात्मक असल्याचं मत चित्रपट व्यापार विश्लेषकांनी नोंदवलं आहे.

हेही वाचा:

The Kashmir Files: बजेट कमी, मोजकं प्रमोशन करूनही ‘द काश्मीर फाईल्स’ची दणक्यात कमाई

‘इंडियन आयडॉल 12’ फेम पवनदीप-अरुणिता कायद्याच्या कचाट्यात; वाचा काय आहे नेमकं प्रकरण?

आधी ‘झुंड’वर ‘पावनखिंड’ भारी, आता ‘द काश्मीर फाईल्सनं’ दाबलं, IMDb रेटिंग्ज पाहिलात का?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.