The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या बंदीवर सर्वोच्च न्यायालयाने उचलले मोठे पाऊल, थेट पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सरकारला
द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. द केरळ स्टोरी हा चित्रपट 5 मे रोजी रिलीज झालाय. विशेष म्हणजे बाॅक्स आॅफिसवर धमाल करताना हा चित्रपट दिसत आहे. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. द केरळ स्टोरी चित्रपटामुळे मोठा वाद सुरू आहे.
मुंबई : द केरळ स्टोरी हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहे. या चित्रपटाने ओपनिंगही जबरदस्त अशी केलीये. द केरळ स्टोरी (The Kerala Story) चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले. अनेकांनी थेट या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. मात्र, असे असताना देखील चित्रपटाची मोठी क्रेझ ही प्रेक्षकांमध्ये बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे अनेकांनी सोशल मीडियावर (Social media) पोस्ट शेअर करत चित्रपटाला सपोर्ट केला आहे. मात्र, असे असताना देखील द केरळ स्टोरी या चित्रपटावर काही राज्यांमध्ये थेट बंदी घालण्यात आलीये. राज्य सरकारच्या या निर्णया विरोधात चित्रपट (Movie) निर्मात्यांनी थेट कोर्टात धाव घेतली.
तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यात द केरळ स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्यात आलीये. दुसरीकडे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय. चित्रपटाच्या निर्मात्यांनी तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये घेण्यात आलेल्या निर्णया विरोधात कोर्टात दाद मागितली. चित्रपटावर बंदी घालण्याच्या अधिकार यांना कोणी दिल्याचे थेट निर्मात्यांनी म्हटले.
या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी झालीये. सर्वोच्च न्यायालयाने द केरळ स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्यांच्या याचिकेनंतर पश्चिम बंगाल सरकारला नोटीस पाठवली आहे. याचिकेत पश्चिम बंगाल सरकारच्या चित्रपटावर बंदी घालण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. कोर्टाने ही नोटीस पश्चिम बंगाल सरकारला पाठवली आहे.
इतकेच नाही तर तामिळनाडू सरकारला देखील या प्रकरणात जवाब मागितला आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी ही 17 मे रोजी होणार आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी यावर मोठा प्रश्न उपस्थित करत म्हटले की, संपूर्ण देशात चित्रपट दाखवला जात आहे मग फक्त पश्चिम बंगालमध्येच का नाही? लोकांना ठरू द्या चित्रपट चांगला आहे की, वाईट.
द केरळ स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्यांनी अगोदरच या प्रकरणात लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली होती. विशेष म्हणजे दोन राज्यांमध्ये चित्रपटावर बंदी असताना देखील द केरळ स्टोरी हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या कमाईमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता विकेंडचा फायदा देखील चित्रपटाला होण्याची दाट शक्यता आहे.
द केरळ स्टोरी या चित्रपटात अदा शर्मा हिने महत्वाची भूमिका केलीये. अनेकांनी अदा शर्मा हिच्या अभिनयाचे काैतुक देखील केले. द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे अनुपम खेर आणि विवेक अग्निहोत्री यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाचे समर्थन केले. अनुपम खेर म्हणाले की, जे लोक द कश्मीर फाईल्सला विरोध करत होते तेच लोक आज द केरळ स्टोरीला विरोध करत आहेत.