Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Krrish 4 | ‘क्रिश 4’ मध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत कियारा अडवाणी दिसण्याची शक्यता!

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन लवकरच क्रिश 4 मध्ये दिसणार आहे. चित्रपटाची तयारी वेगाने सुरू झाली आहे.

Krrish 4 | 'क्रिश 4' मध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत कियारा अडवाणी दिसण्याची शक्यता!
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 8:02 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन लवकरच क्रिश 4 मध्ये दिसणार आहे. चित्रपटाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. चित्रपटाचे स्क्रिप्ट जवळपास पूर्ण झाले आहे. या चित्रपटासाठी राकेश रोशनही खूप मेहनत घेत आहेत. मात्र, चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीबद्दल अजूनही चर्चा सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार कियारा अडवाणी क्रिश 4 मध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसू शकते, असे सांगितले जात आहे. निर्माते आणि राकेश रोशन यांना कियाराला चित्रपटात घेण्याची इच्छा आहे आणि तिच्याशी चर्चा देखील सुरू आहे. (The Krrish 4 movie is coming soon)

खरं तर अशी बातमी होती की, कृती सेनन या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून दिसणार होती. मात्र, कृतीकडे आधीच बरेच चित्रपट आहेत. असे सांगितले जात आहे की कृतीकडे 5 मोठे चित्रपट आहेत ज्यामध्ये ती काम करत आहे. यामुळे आता कियारा अडवाणीच्या नावाचा विचार केला जात आहे. हृतिक रोशन वॉर चित्रपटाच्या नंतर इतर कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला वॉर हा चित्रपट जबरदस्त हिट झाला होता.

दिग्दर्शक आणि सिनेनिर्माते राकेश रोशन यांना मध्यंतरी घशाचा कर्करोग झाला होता. याची माहिती त्यांचा मुलगा ऋतिक रोशनने दिली होती. सोशल मीडियावर त्याने याबाबत पोस्ट केली होती.

हृतिक रोशनने जीममधील वडिलांसोबतचा फोटो पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये तो म्हणाला होता की, मी आज सकाळीच पापांना जीमसाठी विचारलं. मला माहिती होतं, ते सर्जरीच्या दिवशीही व्यायाम करणं सोडणार नाहीत. नुकतंच घशात Squamous Cell Carcinoma चं निदान झालंय. आज ते याच्याशी झुंज देणार आहेत. आम्ही नशिबवान आहोत की आमच्या कुटुंबाला तुमच्यासारखा व्यक्ती मिळालाय.”

बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून कॅन्सर झाल्याचे अनेक वृत्त समोर आले आहेत. अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाल्याचंही समोर आलं होतं. यावर तिने परदेशात उपचार घेतले होते.  सात महिने न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतल्यानंतर सोनाली बेंद्रे मुंबईत परतली आहे.

संबंधित बातम्या :

sushant singh rajput | सुशांतचा ‘दिल बेचारा’ चित्रपट अव्वल, ट्विटर इंडियाची यादी जाहिर

वेब सीरीज AK vs AK अडकली वादात, भारतीय वायुसेनाने दिग्दर्शकांना पाठवले पत्र!

(The Krrish 4 movie is coming soon)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.