मनोरंजन विश्वातील सगळ्यात महागडे घटस्फोट! पोटगी म्हणून द्यावी लागली ‘इतकी’ रक्कम…
प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी आणि नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य 2017 मध्ये विवाहबद्ध झाले. दोघेही दक्षिण भारतीय मनोरंजन विश्वातील क्युट जोडपे मानले जातात. पण आता असे वृत्त आले आहे की, दोघेही लवकरच घटस्फोट घेणार आहेत.
मुंबई : प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी आणि नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य 2017 मध्ये विवाहबद्ध झाले. दोघेही दक्षिण भारतीय मनोरंजन विश्वातील क्युट जोडपे मानले जातात. पण आता असे वृत्त आले आहे की, दोघेही लवकरच घटस्फोट घेणार आहेत. मात्र, घटस्फोटाच्या बातमीवर अद्याप दोघांपैकी कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अहवालानुसार, सामंथा आणि नागा चैतन्यच्या वैवाहिक जीवनात दुरावा येण्याचे कारण अभिनेत्रीचे तिच्या करिअरवरील प्रेम आहे. लग्नानंतरही सामंथा चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स चित्रीत करत आहे, जे तिचे सासरे नागार्जुन यांना आवडत नाहीत. असेही म्हटले जात आहे की, सामंथाने घटस्फोटासाठी 50 कोटींची पोटगी मागितली आहे. पण पोटगीबद्दल कोणी चर्चेत असण्याची ही पहिली वेळ नाही. आज आम्ही तुम्हाला उद्योगातील सर्वात महागड्या घटस्फोटांबद्दल सांगणार आहोत…
हृतिक रोशन आणि सुझान खान
हृतिक रोशन आणि सुझानचा घटस्फोट केवळ देशातच नव्हे, तर जगातील सर्वात महागड्या घटस्फोटांमध्ये गणला जातो. वर्ष 2000मध्ये दोघांचे लग्न झाले आणि अफेअरच्या बातमीमुळे दोघांनी घटस्फोट घेतला होता. असे म्हटले जाते की, सुझान खानने पोटगी म्हणून 400 कोटी रुपयांची मागणी केली होती, त्यापैकी 380 कोटी रुपये तिला देण्यात आले होते. मात्र, दोघांनी नंतर दुसरे लग्न केले नाही. घटस्फोटानंतर दोघेही पुन्हा एकमेकांच्या जवळ आले.
सैफ अली खान आणि अमृता सिंग
लग्नाप्रमाणेच सैफ आणि अमृताच्या घटस्फोटामुळेही बऱ्याच चर्चा झाल्या. 13 वर्षांनी मोठ्या अमृताशी लग्न केल्यानंतर 13 वर्षांनी सैफने तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. एका मुलाखतीत सैफने सांगितले होते की, घटस्फोटाच्या वेळी 5 कोटी रुपये पोटगी निश्चित करण्यात आली होती, त्यावेळी त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत त्याने अमृताला फक्त अडीच कोटी रुपये दिले. उर्वरित रक्कम सैफकडून हप्त्यांमध्ये दिली गेली. बऱ्याच वर्षांनंतर सैफने करीना कपूरसोबत लग्न केले.
करिश्मा कपूर आणि संजय कपूर
करिश्मा कपूरने लग्नाच्या 11 वर्षानंतर 2016 मध्ये घटस्फोट घेतला. संजयपासून घटस्फोट घेतल्यानंतर करिश्माला मुंबईच्या खार भागात घर आणि मुलांसाठी 14 कोटींचे बॉण्ड मिळाले. ज्या अंतर्गत उद्योगपती संजय करिश्माला दरमहा 10 लाख रुपये देतो. हा पैसा त्यांच्या दोन मुलांच्या संगोपनावर खर्च केला जातो. लग्नाच्या वेळी संजयच्या कुटुंबीयांनी करिश्माला जे दागिने दिले होते तेही तिच्याकडून परत घेतले गेले नाहीत.
आदित्य चोप्रा आणि पायल खन्ना
फिल्ममेकर आदित्य चोप्रा यांनी त्याच्या बालपणीची मैत्रीण पायल खन्नाशी लग्न केले. आदित्यने पत्नी पायलपासून घटस्फोट घेण्यासाठी 50 कोटी रुपये दिले होते. यासह, आदित्यचा घटस्फोट देखील देशातील सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक ठरला. नंतर आदित्यने राणी मुखर्जीशी लग्न केले. राणी आणि आदित्य यांनी इटलीमध्ये लग्न केले. खूप जवळचे लोक उपस्थित होते.
प्रभुदेवा आणि रामलता
प्रभुदेवांनी 1995 मध्ये रामलताशी लग्न केले होते. दोघांचेही पारंपारिक रीतीरिवाजानुसार लग्न झाले. प्रभुदेवांनी 2011 मध्ये रामलताला घटस्फोट दिला. पण या घटस्फोटासाठी त्याला एवढी मोठी पोटगी द्यावी लागली की, तो अक्षरशः दिवाळखोर झाला.
हेही वाचा :
Video : ‘अनुपमा’च्या सुनेचा सासऱ्यासोबत धमाल डान्स, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल!