Malaika Arora | ‘मलायका अरोरा’च्या त्या आयटम साँगवर भडका पाकिस्तानी अभिनेता

आयुष्मान खुरानाच्या आगामी एन अ‍ॅक्शन हिरो या चित्रपटात मलायकाने एक आयटम साँग केले आहे.

Malaika Arora | 'मलायका अरोरा'च्या त्या आयटम साँगवर भडका पाकिस्तानी अभिनेता
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 3:35 PM

मुंबई : मलायका अरोरा तिच्या बोल्ड लूकमुळे कायमच चर्चेत असते. अरबाज खान आणि मलायका अरोराचा मुलगा अरहान खान लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अरबाज खानसोबत घटस्फोट घेताना आपल्या मनात नेमके काय सुरू होते आणि त्यावेळी नेमकी परिस्थिती काय होती, याबद्दल पहिल्यांदाच मलायकाने उघड भाष्य केले आहे. आयुष्मान खुरानाच्या आगामी एन अ‍ॅक्शन हिरो या चित्रपटात मलायकाने एक आयटम साँग केले आहे. एन अॅक्शन हिरो या चित्रपटात मलायकाच्या आयटम साँगने धमाका होणार आहे.

आयुष्मानचा हा एन अ‍ॅक्शन हिरो चित्रपट 2 डिसेंबरला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण मलायका अनेक वर्षांनंतर चित्रपटात आयटम साँग करताना दिसणार आहे.

एन अ‍ॅक्शन हिरो चित्रपटातील मलायका अरोराचे आयटम साँग बघण्यासाठी चाहते आतुर आहेत. मात्र, दुसरीकडे यावर टीका देखील केली जात आहे. एका पाकिस्तानी कलाकाराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत. या गाण्यावर निशाना साधला आहे.

आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए…या गाण्यावर रीमिक्स वर्जन केले आहे. यावर पाकिस्तानी अभिनेता अदनान सिद्दीकीने आपली नाराजी व्यक्त केली आहे. अदनान याने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केलीये.

बाॅलिवूडवाले पाकिस्तानी गाण्याची चोरी करत असल्याचे देखील अदनान सिद्दीकीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ही पोस्ट शेअर करताना त्याने मलायकाच्या गाण्याचा हॅशटॅग दिला आहे.

आता सोशल मीडियावर अदनान सिद्दीकीने केलेली पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, भारतामध्ये मलायकाच्या या गाण्याची प्रचंड क्रेझ बघायला मिळत आहे. हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

एन अ‍ॅक्शन हिरो या चित्रपटात आयुष्मान खुराना महत्वाच्या भूमिकेत आहे. आयुष्मानचे दोन चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले आहेत. आता हा चित्रपट नेमका काय धमाका करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....