Sunny Deol | दुसऱ्या दिवशीच चुप चित्रपटाची जादू फिकी, इतक्या कोटींचे झाले कलेक्शन….
चुप चित्रपटाचे पहिल्या दिवशी 75 रूपये तिकिट होते. यामुळे तब्बल 4 लाख तिकिटे विकली गेली होती. मात्र, चित्रपटासाठी दुसरा दिवस अडचणींचा ठरलाय.

मुंबई : सनी देओल (Sunny Deol) आणि दुलकर सलमान यांचा चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट हा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. सनीच्या चुप (Chup) चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ सुरूवातीपासून बघायला मिळत होती. या चित्रपटाचा ओपनिंग डे चांगला राहिला. राष्ट्रीय चित्रपट दिनाचा फायदा बाॅक्स ऑफिसवरील कलेक्शनवर थेट झाल्याचे बघायला मिळाले. पहिल्या दिवशी चित्रपटाची (Movie) तब्बल 4 लाख तिकिटे विकली गेली होती. पहिल्या दिवस चित्रपटासाठी लकी ठरला.
दुसऱ्या दिवशी चुप चित्रपटाची बाॅक्स आॅफिसवरील जादू फिकी
चुप चित्रपटाचे पहिल्या दिवशी 75 रूपये तिकिट होते. यामुळे तब्बल 4 लाख तिकिटे विकली गेली होती. मात्र, चित्रपटासाठी दुसरा दिवस अडचणींचा ठरलाय. बाॅक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी चित्रपट काही खास कमाई करू शकला नाहीये. रिपोर्टनुसार, चुप चित्रपटाने दुसऱ्या दिवशी बाॅक्स ऑफिसवर 1.20 कोटींचे कलेक्शन केले. चित्रपटाने पहिल्या दिवशी 3.06 कोटींचे कलेक्शन केले होते. दुसरा दिवस चुप चित्रपटासाठी काही खास राहिला नाहीये.
चुप चित्रपटामध्ये सनी देओल आणि दुलकर सलमान महत्वाच्या भूमिकेत
चुप हा चित्रपट आर बाल्की दिग्दर्शित आहे. सनी देओल, दुलकर सलमान, पूजा भट्ट आणि श्रेया धन्वंतरी या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. सनी देओलचा हा चित्रपट बहुचर्चित आहे. 25 तारखेला रविवार असल्याने चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धमाका करेल असे सांगितले जात आहे. या चित्रपटामध्ये सनी देओल हा एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाचे एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केले होते.