किसी का भाई किसी की जान चित्रपटातील दुसरे गाणे बिल्ली बिल्ली या दिवशी धमाका करणार, सलमान खान याने…
सलमान खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित किसी का भाई किसी की जान हा चित्रपट एप्रिल 2023 मध्ये ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.
मुंबई : सलमान खान (Salman Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमान खान याच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून बिग बाॅस फेम शहनाज गिल (Shehnaaz Gill) ही बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सलमान खान याने किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी शहनाजला दिलीये. बिग बाॅसमधून बाहेर पडल्यापासून शहनाज गिल हिच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झालीये. विशेष म्हणजे पहिल्याच चित्रपटामध्ये सलमान खान याच्यासोबत काम करण्याची संधी शहनाज गिल हिला मिळालीये. बिग बाॅसमध्ये (Bigg Boss) सहभागी होण्याच्या अगोदर शहनाजची खास फॅन फालोइंग नव्हती.
सलमान खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित किसी का भाई किसी की जान हा चित्रपट एप्रिल 2023 मध्ये ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटात सलमान खान काय धमाका करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सलमान खान याचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटामध्ये सलमान खान याची झलक चाहत्यांना बघायला मिळाली होती. शाहरूख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. सलमान खान हा पठाणला वाचवण्यासाठी आल्याचे चित्रपटामध्ये दाखवण्यात आलंय.
किसी का भाई किसी की जान या चित्रपटामधील पहिले गाणे नय्यो लगदा हे काही दिवसांपूर्वी रिलीज झाले. विशेष म्हणजे या गाण्याला चाहत्यांनी खूप जास्त प्रेमही दिले. आता याच चित्रपटातील दुसरे गाणेही चाहत्यांच्या भेटीला लवकरच येणार आहे. गाण्याच्या रिलीज डेटबद्दल स्वत: सलमान खान याने माहिती शेअर केलीये.
किसी का भाई किसी की जान चित्रपटामधील दुसरे गाणे बिल्ली बिल्ली (Billi Billi Song) हे 2 मार्चला रिलीज होणार आहे. याबाबतची खास पोस्ट सलमान खान याने शेअर केलीये. सलमान खान याने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये दोन मांजरी दिसत आहेत. आता सलमान खान याची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटामधील दुसरे गाणे पाहण्यास चाहते आतुर आहेत.