Uorfi Javed | ट्रोलर्सवर भडकत थेट म्हणाला हे बकवास, उर्फी जावेद हिच्यासाठी ‘हा’ गायक मैदानात
उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. अनेकदा उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते. इतकेच नाही तर आतापर्यंत उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याची धमक्या दिल्या आहेत. मात्र, असे असताना देखील उर्फी जावेद अतरंगी कपडे घालते.
मुंबई : उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांच्या स्टाईलमुळे अनेकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येते. उर्फी जावेद (Uorfi Javed) आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळते. उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांच्या स्टाईलमुळे अनेकदा टिकेचा सामना करावा लागतो. मात्र असे बरेच लोक आहेत जे उर्फी जावेद हिचे समर्थन जाहिरपणे करतात. बिग बाॅस (Bigg Boss) ओटीटीपासून उर्फी जावेद ही चर्चेत आलीये. विशेष म्हणजे बिग बाॅसमधून बाहेर पडल्यापासूनच उर्फी जावेद हिची फॅन फाॅलोइंग (Fan following) चांगलीच वाढलीये. काही दिवसांपूर्वीच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या मोर्चा हा उर्फी जावेद हिच्याकडे वळवला होता. उर्फी जावेद हिच्या कपड्यांमुळे त्यांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
उर्फी जावेद हिला अनेकदा तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. उर्फी जावेद हिला एका ब्रोकरने बलात्कार करून थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती. उर्फी जावेद हिने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या ब्रोकरला बिहारमधून अटक केली. विशेष म्हणजे हा ब्रोकर उर्फी जावेद हिच्या ओळखीचाच असल्याचा खुलासा तिने केला होता.
रॅपर आणि गायक हनी सिंह हा काही दिवसांपासून चर्चेत आहे. हनी सिंह याचा अल्बम चाहत्यांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे या अल्बमचे जोरदार प्रमोशन करताना हनी सिंह हा दिसत आहे. नुकताच हनी सिंह याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये हनी सिंह हा उर्फी जावेद हिचे समर्थन करताना दिसला. हनी सिंह याने उर्फी जावेद हिच्याबद्दल मोठे भाष्य केले आहे.
हनी सिंह म्हणाला की, एक मुलगी आहे उर्फी जावेद. ती अत्यंत बोल्ड कपडे घालून बाहेर निघते. लोक तिच्याबद्दल बकवास करतात. ती काहीपण घालेल…हे 2023 आहे. आपण लोक कुठे जात आहोत. उर्फी जावेद हिचे समर्थन करताना पुन्हा एकदा हनी सिंह हा दिसला आहे. उर्फी जावेद हिच्याबद्दल लोक बकवास करत असल्याचे देखील थेट हनी सिंह हा म्हणाला आहे.
यापूर्वी ही हनी सिंह उर्फी जावेद हिच्याबद्दल म्हणाला होता की, मला उर्फी जावेद ही खूप आवडते. कारण ती खूप जास्त निडर आहे बिनधास्त आहे. ती तिच्या पध्दतीने तिचे आयुष्य जगू इच्छित आहे. मला वाटते की, देशातील प्रत्येक मुलीने तिच्याकडून काही गोष्टी या शिकायला हव्यात. उर्फी जावेद हिला कायमच तिच्या कपड्यांमुळे टार्गेट केले जाते. बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर यानेही उर्फी जावेद हिच्यावर काही दिवसांपूर्वीच टिका केली होती.