Chup Teaser | ‘चुप’ चित्रपटाचा टीझर रिलीज अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला टीझर!

बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक आर बाल्की यांचा चित्रपट 'चूप रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट' हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. गेल्या वर्षी दिग्दर्शक आर बाल्की यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना या कथेची खूप दिवसांपासून कल्पना होती. आणि आता ही कथा पडद्यावर आणणार येणार आहे.

Chup Teaser | 'चुप' चित्रपटाचा टीझर रिलीज अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला टीझर!
Image Credit source: इंस्टाग्राम
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 1:57 PM

मुंबई : 9 जुलैला हिंदी चित्रपटसृष्टीतील महान दिग्दर्शक आणि अभिनेते गुरु दत्त यांची बर्थ एनिवर्सरी असते. त्यानिमित्ताने चित्रपट (Movie) दिग्दर्शक आर बाल्की यांनी त्यांच्या चुप रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट या चित्रपटाचा टीझर रिलीज केले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे टीझर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हा चित्रपट गुरु दत्त यांना श्रद्धांजली असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये सनी देओल, सलमान दिसत आहेत या दोघांशिवाय पूजा भट्ट (Pooja Bhatt) देखील चित्रपटात दिसणार आहे.

इथे पाहा चित्रपटाचे टीझर

हे सुद्धा वाचा

वाचा टीझरमध्ये नेमके काय आहे

चित्रपटाचा टीझर दुलकर सलमानने सुरू होतो. तो कागद कापून फुले बनवताना दिसत आहे आणि गुरु दत्तच्या ‘कागज के फूल का’ चित्रपटाच्या ट्यूनवर हॅपी बर्थडे गाताना दिसतो. कात्रीने कागद कापत फुले बनवतो आणि त्याचा पुष्पगुच्छ बनतो. मग एका मुलीला हा फुलांचा पुष्पगुच्छ देतो. कागदाचा गुलदस्ता पाहून मुलगी म्हणते, ‘कागज का फूल’ गुरू दत्तच्या वाढदिवसानिमित्त ‘कागज के फूल’ची त्यावेळी खूप चर्चा झाली होती, तेव्हाच टीझरमध्ये सनी देओल दिसतो.

इथे पाहा अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली पोस्ट

 दिग्दर्शक आर बाल्की म्हणाले की…

बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक आर बाल्की यांचा चित्रपट ‘चूप रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. गेल्या वर्षी दिग्दर्शक आर बाल्की यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना या कथेची खूप दिवसांपासून कल्पना होती. आणि आता ही कथा पडद्यावर आणणार येणार आहे. या चित्रपटात पूजा भट्टही दिसणार आहे. गुरु दत्त वयाच्या 39 व्या वर्षी 10 ऑक्टोबर 1964 रोजी निधन झाले. त्या दिवशी ते पेडर रोडवरील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले होते.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.