Rhea Chakraborty : ‘द टाइम्स’कडून मोस्ट डिझायरेबल वुमनची यादी जाहीर, रिया चक्रवर्ती अव्वल स्थानी

द टाइम्सकडून 50 मोस्ट डिझायरेबल वुमन 2020 ची यादी समोर आली आहे. रियानं अनेक सेलिब्रिटींना मागे टाकत या यादीत अव्वल स्थान मिळवलं आहे. ('The Times' releases list of Most Desirable Women, Rhea Chakraborty tops)

Rhea Chakraborty : 'द टाइम्स'कडून मोस्ट डिझायरेबल वुमनची यादी जाहीर, रिया चक्रवर्ती अव्वल स्थानी
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 1:53 PM

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) अनेक ठिकाणी टीकेचा सामना करावा लागला. इतकंच नाही तर तुरूंगातून आल्यानंतर रियाच्या व्यावसायिक जीवनावरही याचा बराच परिणाम झाला. मात्र यादरम्यान रियाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.

50 मोस्ट डिझायरेबल वुमन 2020

द टाइम्सकडून 50 मोस्ट डिझायरेबल वुमन 2020 ची यादी समोर आली आहे. या यादीमध्ये अशा कलाकारांचा समावेश करण्यात आला होता, जो मागील वर्षी जास्त चर्चेत होता. ऑनलाईन वोटिंग झाल्यानंतर ही यादी समोर आली आहे.

विशेष म्हणजे रिया चक्रवर्ती या यादीमध्ये टॉपवर आहे. रियानं अनेक सेलिब्रिटींना मागे टाकत या यादीत अव्वल स्थान मिळवलं आहे. गेल्या वर्षी रिया सर्वाधिक चर्चेत होती. सुशांतच्या मृत्यूनंतर रियानं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं की ती सुशांतची गर्लफ्रेन्ड आहे आणि सीबीआयनं या प्रकरणाची चौकशी करावी.

दिशा आणि दीपिकाला सोडलं मागे

या यादीमध्ये रियानं दीपिका पादुकोण आणि दिशा पटानी यांनाही मागं सोडलं आहे. तर या यादीत अ‍ॅडलिन कॅस्टेलिनो (मिस युनिव्हर्स 2020 ची थर्ड रनर अप) दुसर्‍या क्रमांकावर, दिशा पटानी तिसऱ्या क्रमांकावर, कियारा अडवाणी चौथ्या क्रमांकावर आणि दीपिका पादुकोण पाचव्या क्रमांकावर आहेत.

रियाचं प्रोफेशनल आयुष्य

रियाच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, सुशांतच्या मृत्यूपूर्वी तिनं ‘चेहरे’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. या चित्रपटात इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट यावर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोना परिस्थितीमुळे या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

जेव्हा चित्रपटाचं पोस्टर्स आणि टीझर रिलीज झालं तेव्हा रिया चक्रवर्ती त्यात दिसली नाही. मात्र ट्रेलरमध्ये रियाची छोटीशी झलक पाहायला मिळाली तरी.

याशिवाय रियाकडे सध्या दुसरा कोणताही प्रोजेक्ट नाही. सध्या ती कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.

संबंधित बातम्या

Photo : ‘ये जवानी है दिवानी’ फेम अभिनेत्री एवलिन शर्मा लग्न बंधनात, सोशल मीडियावर ‘फॉरएव्हर’ म्हणत फोटो शेअर

Video : जुन्नरमधील श्वेता शिंदेचा धमाकेदार डान्स पाहिलात?, ‘ड्रीमम वेकपम’गाण्यावर धरला ठेका

Lookalike : मॉर्डन मधुबाला, ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत मिळाला होता ब्रेक

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.