KKBKKJ Movie Trailer | अॅक्शन आणि रोमान्सचा जबरदस्त तडका, सलमान खान याच्या लूकवर चाहते फिदा, ट्रेलर रिलीज
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा त्याच्या आगामी किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आले. सलमान खान याच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहाताना दिसत आहेत. सलमान खान याचा हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
मुंबई : किसी का भाई किसी की जान या सलमान खान (Salman Khan) याच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. सलमान खान याचा हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट असून या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. शाहरूख खान (Shah Rukh Khan)याच्या चित्रपटामध्ये सलमान खान याची झलक चाहत्यांना बघायला मिळाली. विशेष म्हणजे किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटातून शहनाज गिल ही बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. शहनाज गिल हिच्यासोबतच श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी देखील किसी का भाई किसी की जान या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे.
किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी तो दिवस आला आणि आज सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. विशेष म्हणजे रिलीज झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळताना देखील दिसतोय.
ट्रेलरमध्ये सलमान खान याचा जबरदस्त असा लूक दिसतोय. किसी का भाई किसी की जान चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांमधील उत्साह वाढलाय. 21 एप्रिल रोजी सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज होतोय. ईदच्या दिवशी सलमान खान याचा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यास तयार आहे.
ट्रेलरमध्ये सलमान खान हा त्याच्या जुन्या लूकमध्ये दिसलाय. विशेष म्हणजे सलमान खान किंवा चित्रपटाची टिम चित्रपटाचे काही खास प्रमोशन करताना देखील दिसत नाहीये. मात्र, शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटाचे सर्व रेकाॅर्ड सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट तोडेल असा अंदाजा व्यक्त वर्तवला जातोय. बाॅलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट पठाण हा ठरलाय.
सलमान खान याच्याशिवाय व्यंकटेश, पूजा हेगडे, जगपती बाबू हे देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहेत. ट्रेलरमध्ये सलमान खान भाईजानच्या भूमिकेत दिसतोय. विशेष म्हणजे या चित्रपटात अॅक्शन आणि रोमान्सचा जबरदस्त तडका प्रेक्षकांच्या बघायला मिळणार आहे. ट्रेलर लॉन्च इवेंटमध्ये सलमान खान हा ब्लॅक कपड्यांमध्ये पोहचला. आता याचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.