Video | हेल्मेट न घालता अजय देवगण याने चालवली स्कूटी, अभिनेत्याला पाहून लोकांनी केली मोठी गर्दी
नुकताच अजय देवगणचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अजय देवगणचा दृश्यम 2 हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करतोय. कोरोनानंतर बाॅलिवूडचा हाच चित्रपट बाॅक्स आॅफिसवर सुपरहिट ठरलाय. आता अजय देवगण त्याच्या आगामी भोला या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झालाय. मात्र, नुकताच अजय देवगणचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अजय देवगण हेल्मेट न घालता मस्त गाडीवर फिरताना दिसतोय.
अजय देवगण आणि तब्बू हिने दृश्यम 2 मध्ये जबरदस्त अभिनय केलाय. विशेष म्हणजे हा त्यांचा आठवा चित्रपट आहे. अजय याने जो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. ज्यामध्ये तो गाडीवरून रस्त्याने जात आहे आणि असंख्य लोक त्याच्या मागे पळत आहेत. हा व्हिडीओ शूटिंगच्या वेळीचा आहे.
View this post on Instagram
आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहून फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी लोक त्याच्या मागे धावत आहेत. विशेष म्हणजे व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, अजय हा स्कूटी चालवत आहे आणि त्याच्या मागे एक व्यक्ती बसलीये. लोकांची वाढती गर्दी बघता अजय वेगाने स्कूटी चालवत आहे.
अजयने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. अजयने हा व्हिडीओ शेअर करताना हे सांगितले आहे की, स्कूटी चालवताना नेहमीच हेल्मेट घालणे आवश्यक आहे. मी नाही घातले, कारण मी शूटिंग करत होतो.
अजय देवगणची लेक न्यासा देवगण ही लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. करण जोहर न्यासा देवगणला लाॅन्च करणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, न्यासा ही नेमक्या कोणत्या चित्रपटात दिसणार आहे, हे अजून कळू शकले नाहीये.