Video | हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचा विमानतळावरच लिपलॉक, नेटकरी म्हणाले अरे आवरा जरा…
हृतिक आणि सबा आझाद यांची केमिस्ट्री लोकांना आवडत नाही. सबा आझाद हिने काही दिवसांपूर्वी हृतिक रोशन याच्यासोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
मुंबई : हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. सबा आझाद किंवा हृतिक रोशन यांनी त्यांच्या नात्यावर अजून काही भाष्य केले नाहीये. मात्र, काही दिवसांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. नुकताच मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) हृतिक आणि सबा स्पाॅट झाले असून हृतिक रोशन याला सोडण्यासाठी सबा आझाद ही विमानतळावर आली होती. मात्र, यावेळी असे काही घडले की, लोक हृतिक रोशन आणि सबा आझाद (Saba Azad) यांच्यावर टिका करत आहेत. हृतिक आणि सबाचा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे.
हृतिक रोशन हा 48 वर्षांचा आहे, तर सबा आझाद त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. यामुळेच हृतिक आणि सबा आझाद यांची केमिस्ट्री लोकांना आवडत नाही. सबा आझाद हिने काही दिवसांपूर्वी हृतिक रोशन याच्यासोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी नेटकऱ्यांनी बापाची आणि मुलीची जोडी छान दिसत असल्याचे म्हटले होते.
सबा आझाद आणि हृतिक रोशन यांना सर्वात अगोदर पहिल्यांदा एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पैपराजी यांनी बघितले होते. तेंव्हापासून यांचे रिलेशन चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, हृतिक रोशन हा लवकरच सबा आझाद हिच्यासोबत लग्न करणार आहे. मात्र, यावर हृतिक रोशन याने काही भाष्य केले नाहीये.
View this post on Instagram
हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचा विमानतळावरील व्हायरल होणार व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये हृतिक रोशन याने थेट सबा आझाद हिला किस केले आहे. सार्वजनिक ठिकाणी हृतिक रोशन याने हे केल्यामुळे त्याला खडेबोल सुनावले जात आहेत. अनेकांनी या व्हिडीओवरून आता हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचा क्लास लावला आहे.
सबा आझाद ही हृतिक रोशन याला सोडण्यासाठी विमानतळावर पोहचली असताना गाडीमधून उतरताना हृतिक रोशन याने सबा आझाद हिला किस केले, ज्याचा व्हिडीओ आता व्हायरल होतोय. या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, हा फक्त दिखावा आहे, प्रेम वगैरे काही नाही. दुसऱ्याने लिहिले की, हे बाॅलिवूडचे लोक कधी काय करतील याचा अजिबात नेम राहिला नाहीये. तिसऱ्याने लिहिले की, अरे आवरा जरा यांना कोणीतरी