बांगलादेशमध्ये धमाका करताना दिसतोय शाहरुख खान याचा चित्रपट, पठाणचा तो व्हिडीओ व्हायरल
शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहे. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवरील अनेक रेकाॅर्ड तोडले.
मुंबई : शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. विशेष म्हणजे शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा पठाण हा चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना दिसला. पहिल्याच दिवशी पठाण (Pathaan) चित्रपटाने सर्वांना मोठा धक्का देत थेट 100 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हाच चित्रपट (Movie) ठरला. शाहरुख खान याच्या चित्रपटाने कमाईमध्ये बाहुबली चित्रपटाला देखील मागे टाकले. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. मात्र, वादाचा फायदा हा चित्रपटाला झाला.
पठाण चित्रपटातील बेशर्म रंग गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. शाहरुख खान हा पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर चाहत्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात होता. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.
शाहरुख खान याचा 2019 मध्ये झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, शाहरुख खान याचा हा चित्रपट फ्लाॅप गेला. त्यानंतर शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर गेला. शाहरुख खान याचे चाहते सतत त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. शेवटी पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने दणदणीत पुनरागमन केले.
नुकताच बांगलादेशमध्ये शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाची तिथे मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर बांगलादेशमधील एका थिएटरमधील व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पठाण चित्रपटातील झुमे जो पठाण या गाण्यावर थिएटरमध्ये प्रेक्षक जबरदस्त असा डान्स करताना दिसत आहेत. पठाण चित्रपटाला बांगलादेशमध्ये मोठे प्रेम मिळताना दिसत आहे.
शाहरुख खान याने पठाण चित्रपटानंतर लगेचच जवान आणि डंकी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. जवान चित्रपटाच्या सेटवरील अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले. शाहरुख खान हा काही दिवसांपूर्वी डंकी चित्रपटाची शूटिंग करण्यासाठी कश्मीर येथे पोहचला होता. यावेळी शाहरुख खान याला विमानतळावर पाहून चाहत्यांनी मोठी गर्दी केली. मात्र, शाहरुख खान याने चाहत्यांकडून दुर्लक्ष केल्याने त्याला काही दिवस सोशल मीडियावर टार्गेट केले गेले.