Dispute | अयान मुखर्जी आणि करण जोहर यांच्यामध्ये वाद, खरोखरच या कारणामुळे मैत्री तुटली?
करण जोहर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. करण जोहर हा कायमच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतो. प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडबद्दल मोठा खुलासा केल्यानंतर अनेकांनी करण जोहर याला टार्गेट करण्यास सुरूवात केली. आता परत एकदा करण जोहर हा चर्चेत आलाय.
मुंबई : अयान मुखर्जी आणि करण जोहर (Karan Johar) यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. याचे कारणही तेवढेच मोठे आहे. एक चर्चा सतत रंगताना दिसत आहे की, अयान मुखर्जी (Ayan Mukerji) आणि करण जोहर यांच्यामध्ये काहीतरी बिनसले आहे. यांच्या मैत्रीमध्ये मोठी दरार आलीये. मात्र, यावर अजूनही अयान मुखर्जी किंवा करण जोहर यांनी काहीही भाष्य केले नाहीये. सर्वांनाच माहिती आहे की, करण जोहर आणि अयान मुखर्जी हे खूप चांगले मित्र आहेत. मात्र, अयान मुखर्जी हा वॉर 2 चित्रपट डायरेक्ट करणार असल्यानेच करण आणि अयान यांच्यामध्ये वाद (Dispute) झाल्याची चर्चा आहे.
करण जोहर आणि अयान मुखर्जी यांच्यामधील वाद इतका जास्त वाढल्या की, चक्क अयान मुखर्जी याने धर्मा प्रोडक्शनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. जर हे खरे असेल तर हा करण जोहर याच्यासाठी अत्यंत मोठा झटका नक्कीच असणार आहे. रिपोर्टनुसार ब्रह्मास्त्र 2 आणि ब्रह्मास्त्र 3 हे आपले चित्रपट दुसऱ्या प्रोड्यूसर सोबत मिळून करण्याचा निर्णय हा अयान मुखर्जी याने घेतलाय.
इतकेच नाही तर ज्यावेळी अयान मुखर्जी याने ब्रह्मास्त्र 2 आणि ब्रह्मास्त्र 3 चित्रपटांची घोषणा ज्यावेळी केली, त्यावेळी त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना करण जोहर याला टॅग केले नव्हते आणि तेंव्हापासूनच यांच्यामध्ये काहीतरी बिनसले असल्याच्या चर्चा या सातत्याने सुरू आहेत. मात्र, या चर्चांमध्ये करण किंवा अयान यांनी भाष्य करणे देखील टाळले आहे.
करण जोहर यांच्या जवळच्या व्यक्तीने या सर्व अफवा असल्याचे देखील म्हटले आहे. करण जोहर आणि अयान मुखर्जी यांच्यामध्ये वाद व्हावा, यासाठी अशाप्रकारच्या चर्चा केल्या जात असल्याचा आरोपही करण जोहर याच्या जवळच्या व्यक्तीने केला आहे. करण जोहर किंवा अयान मुखर्जी यांच्यापैकी एकानेही यावर भाष्य केले नाही हे अत्यंत विशेष आहे.
गेल्या काही दिवसांपासून करण जोहर याच्या समस्या सातत्याने वाढताना दिसत आहेत. सोशल मीडियावर नेहमीच करण जोहर हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतो. नेपोटिझममुळे करण जोहर याला टार्गेट केले जाते. काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा हिने धक्कादायक खुलासा केला होता. कशाप्रकारे आपल्याला बाॅलिवूडमध्ये एका कोणात ढकलण्याचे काम सुरू आहे हे सांगताना प्रियांका चोप्रा ही दिसली होती. त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.