मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पठाण या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झालाय. चित्रपटाला रिलीज होऊन २४ दिवस उलटले असून अजूनही बाॅक्स आॅफिसवर पठाण चित्रपटाची जादू बघायला मिळत आहे. १७ तारखेला नुकताच कार्तिक आर्यन याचा शहजादा हा चित्रपट (Movie) देखील रिलीज झालाय. मात्र, प्रेक्षकांमध्ये पठाण चित्रपटाचीच क्रेझ बघायला मिळत आहे. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट सुरूवातीपासून बहुचर्चित चित्रपट ठरला आहे. पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर सतत या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती. विशेष म्हणजे एखादा चित्रपट सोडला तर पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर बाॅक्स आॅफिसवर बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात होते. आमिर खान आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्या चित्रपटालाही मोठा फटका बसला आहे.
पठाण चित्रपटाची बाॅक्स आॅफिसवर धमाल सुरू असतानाच आता शाहरुख खान याच्या आगामी जवान या चित्रपटाबद्दल मोठे अपडेट पुढे आले आहे. जवान या चित्रपटामध्ये शाहरुख खान हा महत्वाच्या भूमिकेत आहे. आता या चित्रपटाची वाट शाहरुख खान याचे चाहते पाहात आहेत.
२०२३ हे वर्ष शाहरुख खान याच्यासाठी अत्यंत खास ठरले आहे. कारण याच वर्षामध्ये तब्बल चार वर्षांनंतर शाहरुख खान याने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. तर दुसरीकडे शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान हे दोघेही यंदाच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.
यावर्षी शाहरुख खान याचे एका मागून एक असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतील. जवान आणि डंकी या चित्रपटामधून परत एकदा शाहरुख खान चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. पठाण या चित्रपटामध्ये सलमान खान याची देखील झलक बघायला मिळाली आहे.
शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाबद्दल एक मोठे अपडेट पुढे आले आहे. जून महिन्यात शाहरुख खान याने जवान चित्रपटाचे टीझर रिलीज करत शेअर केले होते. रिपोर्टनुसार शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल केला जाऊ शकतो.
सुमित कडेल यांनी यासंदर्भातील एक पोस्ट शेअर केलीये. जवान हा चित्रपट 2 जून 2023 रिलीज केला जाऊ शकतो. मात्र, निर्मात्यांकडून याबद्दल काही माहिती शेअर करण्यात नाही आली. या चित्रपटाची शाहरुख खान याचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.