जीवे मारण्याच्या धमकीमुळेच सलमान खान याचा कोलकाता येथील शो रद्द? आयोजकांचा मोठा खुलासा
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान हा चर्चेत आहे. चाहते सलमान खान याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात बिग बाॅस फेम शहनाज गिल ही देखील महत्वाच्या भूमिकेत आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यापासून तो प्रचंड चर्चेत आलाय. सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने चाहत्यांमध्ये तणावाचे वातावरण बघायला मिळत आहे. लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर त्याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीये. सध्या सलमान खान हा त्याच्या आगामी किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. सलमान खान याचा हा चित्रपट (Movie) यंदाच रिलीज होतोय. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच शाहरूख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामध्ये सलमान खान याची एक झलक चाहत्यांना बघायला मिळाली. पठाण ज्यावेळी अडचणीमध्ये सापडला होता, त्यावेळी सलमान खान हा त्याच्या मदतीला धावून आल्याचे चित्रपटामध्ये दाखवण्यात आले. किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या माध्यमातून बिग बाॅस फेम शहनाज गिल ही देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर सलमान खान याला एक धमकीचा ईमेल देखील पाठवण्यात आला. पोलिस आता या प्रकरणात तपासणी करत आहेत. दुसरीकडे सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीये. मुंबई पोलिस आणि खासगी सुरक्षारक्षक हे सलमान खान याच्या घराबाहेर तैनात आहेत.
सलमान खान याचा कोलकाता येथे एक शो होणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणामुळे सलमान खान याच्या या शोची तारीख पुढे ढकलल्याची चर्चा आहे. आता यावर आयोजकांनी देखील मोठे स्पष्टीकरण दिले आहे. सततच्या जीवे मारण्याच्या धमक्यांमुळेच सलमान खान याचा हा शो पुढे ढकलल्याची चर्चा जोरदार रंगताना दिसत आहे.
या शोमध्ये फक्त सलमान खान हाच नाहीतर सोनाक्षी सिन्हा, जॅकलिन फर्नांडिस, आयुष शर्मा, प्रभुदेवा आणि गुरु रंधावा हे देखील सहभागी होणार आहेत. या शोचे आयोजक राजदीप चक्रवर्ती म्हणाले की, शो पुढे ढकलला या फक्त आणि फक्त अफवा आहेत. मुळात म्हणजे हा शो एप्रिलमध्ये नव्हेतर मे किंवा जूनमध्ये होणार आहे. सलमान खान याची टिम येऊन नुकताच सर्वकाही पाहून गेलीये. सलमान खान याच्या आगामी चित्रपटात श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.