रवीना टंडन हिच्यामुळे एकेकाळी सनी देओल याने अक्षय कुमार याच्यासोबत घेतला होता पंगा
एकाच अभिनेत्रीवर दोन अभिनेते प्रेम करतात. तसाच एक किस्सा आज आम्ही तुम्हाला बाॅलिवूडमधील सांगणार आहोत.

मुंबई : बाॅलिवूडमध्ये असे काही किस्से घडलेले आहेत की, त्याच्याबद्दल प्रेक्षकांना कदाचित माहिती देखील नाहीये. बाॅलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीमधील अनेक राज लपवण्यात आले आहेत. याचपैकी एक म्हणजे अक्षय कुमार, रवीना टंडन, सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्यामध्ये एक मोठा किस्सा घडला होता. असे म्हटले जाते की, जर आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असू आणि ते आपण किती लपवण्याचा प्रयत्न केला तरीही आपण ते कधीच लपवू शकत नाही. यापूर्वी आपण बाॅलिवूडमध्ये पाहिले असेल, एकाच अभिनेत्रीवर दोन अभिनेते प्रेम करतात. तसाच एक किस्सा आज आम्ही तुम्हाला बाॅलिवूडमधील सांगणार आहोत.
रवीना टंडन हिच्यामुळे अक्षय कुमार आणि सनी देओल यांच्यामध्ये हंगामा झाला होता. विशेष म्हणजे शेवटी सनी देओल आणि अक्षय यांच्यामधील भांडणे रवीन टंडन हिला मिटवावी लागली होती.
जिद्दी चित्रपटाची शूटिंग सुरू असताना रवीना टंडन आणि अक्षय कुमार हे रिलेशनशिपमध्ये होते. जिद्दी या चित्रपटामध्ये रवीना टंडनसोबत सनी देओल हा मुख्य भूमिकेत होता.
अक्षय कुमार आणि रवीना यांचे तीन वर्ष डेट करून ब्रेकअप झाले होते. यामुळे रवीना तणावामध्ये होती. इतकेच नाहीतर अनेकवेळा ती सेटवरच रडत देखील होती. हे सनी देओल याने देखील बघितले.
रवीना टंडन हिला रडताना बघितल्यानंतर याचे कारण थेट सनी देओल याने विचारून टाकले. यावर रवीना हिने देखील खरे कारण सांगून टाकले. यानंतर अक्षय कुमार याच्यावर सनी नाराज झाला.
यानंतर सनी देओल आणि अक्षय कुमार यांच्यामध्ये खटके उडायला लागले. याच कारणामुळे सनी आणि अक्षय कुमार यांनी एकमेकांना बोलणे देखील बंद केले. याचे कारण फक्त रवीना टंडन होती.
या वादामध्ये डिंपल कपाडिया हिची देखील एण्ट्री झाली. कारण यादरम्यान डिंपल कपाडिया आणि सनी देओल याच्या अफेअरची चर्चा रंगत होती. जिद्दी चित्रपटाच्या सेटवर सनी देओल आणि रवीना टंडन यांची जवळीकता डिंपल हिला देखील खटकत होती.
रवीना आणि सनी देओल यांच्यातील जवळीकता पाहून एकेदिवसी थेट रवीनाच्या कानाखाली डिंपलने जाळ काढला होता. मात्र, याची एक चर्चा होती. खरोखरच डिंपलने असे केले होते का? सांगणे थोडे अवघड आहे.