Poonam Pandey | पूनम पांडेचे सनसनाटी आरोप ईगोमुळे, पती सॅम बॉम्बेच्या आरोपांनी खळबळ

वादग्रस्त अभिनेत्री म्हणून चर्चेच असलेली पूनम पांडे (Poonam Pandey) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी मात्र तिच्या चर्चेचं कारण थोडं वेगळं आहे. पूनम पांडेनं सप्टेंबर 2020मध्ये निर्माता सॅम बॉम्बेसोबत (Sam bombay) लग्न केलं होतं. पण, पूनम आणि सॅमचं नात फार काळ टिकू शकलं नाही. लग्न झाल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाले.

Poonam Pandey | पूनम पांडेचे सनसनाटी आरोप ईगोमुळे, पती सॅम बॉम्बेच्या आरोपांनी खळबळ
पूनम पांडेImage Credit source: Poonam Pandey/Instagram
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 9:01 AM

मुंबई : वादग्रस्त अभिनेत्री म्हणून चर्चेच असलेली पूनम पांडे (Poonam Pandey) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी मात्र तिच्या चर्चेचं कारण थोडं वेगळं आहे. पूनम पांडेनं सप्टेंबर 2020 मध्ये निर्माता सॅम बॉम्बेसोबत (Sam bombay) लग्न केलं होतं. पण, पूनम आणि सॅमचं नात फार काळ टिकू शकलं नाही. लग्न झाल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाले. सॅम पूनमला मारहाण करत असल्यानं तिला ब्रेन हॅमरेजचा त्रास सुरू झाला असल्याचं देखील पूनमनं त्यावेळी सांगितलं होतं. पूनम पांडेनं मारहाण केल्याची तक्रारही केली होती. यानंतर लगेच या विरोधात कारवाईही करण्यात आली. तक्रार नोंदवल्यानंतर पूनमला रुग्णालयात दाखलं देखील करण्यात आलं होतं. या मारहाणीमध्ये पूनमला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर पूनम पांडे चांगलीच चर्चे आली.

पूनमचे आरोप आणि चर्चा

आपल्या अभिनयाने कायमच चर्चेत असणारी पूनम पांडे सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिअॅलिटी शो ‘लॉक अप’मध्ये सहभागी झाली आहे. याच कार्यक्रमात पूनमनं आपल्या पती म्हणजेच सॅम बॉम्बे संदर्भात मोठा खुलासा केला होता. पूनमने त्यावेळा सांगितलं होतं की तिचा पती सॅमनं तीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला आहे. त्यानंतर तिला मारहाण करण्यात आली. हा आघात इतका होता की मारहाण आणि मानसिक त्रासामुळे ब्रेन हॅमरेजचा त्रास सुरू झाला, असं पूनमं लॉक अप या रिअॅलिटी शोमध्ये सांगतिलं होतं. यानंतर तिच्याविषयी जोरदार चर्चा सुरु झाली. डेटिंग आणि त्यानंतर लग्न केल्यावर पूनम आणि सॅम यांच्यात नेमकं झालं तरी काय, अशाही चर्चा त्यावेळी रंगल्या.

पूनमच्या आरोपांवर सॅम भडकला

अभिनेत्री पूनम पांडेनं रिअॅलिटी शोमध्ये सॅमवर केलेल्या गंभीर आरोपानंतर चर्चा तर होणार ना, पण याच चर्चेमुळे पूनमचा पती आणि निर्माता सॅम बॉम्बे हा भडकला आणि त्यानंतर पूनमच्या आरोपांवर त्यानं पलटवार केला. आपल्या पत्नीकडून लावण्यात आलेल्या आरोपांवर सॅमनं मौन तोडत चांगलाच धमाका केला आणि बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा एका नव्या कपलची चर्चा रंगली. सॅमनं पूनमच्या आरोपांवर बोलताना पुनमला बेवफा म्हणलं. तर पूनमनं हे प्रसिद्धीसाठी केल्याचा आरोप सॅमनं लावला आणि पुन्हा एकदा नव्या कपलच्या वादाला सुरुवात झाली. सॅम म्हणाला, पूनम माझी पत्नी आहे. तिनं आमच्या नात्याला गंभीरतेनं घेतलं नसलं तरी मी घेतलं आहे. आम्ही सोबत केलेले लग्नाचे विधी आणि सात फेरे माझ्यासाठी महत्वाचे आहे.

ईगो आला आणि वाद झाला

असं म्हणतात ईगो आला म्हणजे वाद झाला. ईगो आला की नात्यात दुरावा येतो, त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा पूनम आणि सॅमच्या नात्यातून समोर आली आहे. आता गंमत अशी आहे की पूनम ही अभिनेत्री असली तर सॅम देखील निर्माता आहे. त्यामुळे दोघेही बॉलिवूडमध्ये एकमेकांच्या बरोबरीचे आहेत. यामुळे त्यांच्या वादात सगळ्यात मोठा पॉईंट ठरला ईगो. सॅमनं देखील हे मान्य केलं आहे. सॅम म्हणतो, आमच्या दोघांमध्ये खूप ईगो आहे आणि आमची मोठी अडचण आहे. याचवेळी त्यानं आणखी एक गोष्ट बोलून दाखवली. सॅम म्हणतो, पूनमध्ये गुणवत्ता आहे. पण ती इमानदार नाही. आता याकडे आपण प्रेक्षकांनी कसं पहावं तो आपला प्रश्न आहे. पण, सॅमनं मात्र त्याच्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

पूनमला कौटुंबिक हिंसाचार नाही माहीत?

सॅमनं आपल्या पत्नीच्या आरोपांना उत्तर देताना अनेक खुलासे केले आहेत. घरातील भांडण जेव्हा चव्हाट्यावर येतं तेव्हा सर्व गोष्टी बाहेर निघतात. सॅम पूनमच्या आरोपांना उत्तर देताना म्हणतो, पूनमने रिअॅलिटी शोमध्ये केलेल्या आरोपांच्या आधी देखील तिनं अशाच प्रकारचे आरोप केले होते. तो पुढे म्हणतो, काहीही होऊ शकतं, अनेक पुरुष या समस्येतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना त्यातून बाहेर निघता येत नाही. त्यांना कदाचीत बाहेर पडण्याचा मार्ग माहीत नसतो. एकीकडे ती पोलिसांना बोलावते आणि पोलीस लगेच येतात. मात्र, एक पुरुष जेव्हा पोलिसांना बोलावतो तेव्हा मात्र 20 फोन केले तरी त्याची दखल काही घेतली जात नाही. पूनमनं हनीमूनला मला अटक करायला लावली होती. पूनमला माहिती नाही कौटुंबिक हिंसाचार (Domestic violence) नेमका काय असतो, असंही सॅम आरोप करताना म्हणाला. सप्टेंबर 2020 मध्ये लग्न झाल्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये पूनमला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी सॅमला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

मनोरंजनाच्या इतर बातम्या

अमिताभ नावाचं गारुड कित्येक वर्षापासूनच आहे; नागराज उगाच म्हणत नाही माझं स्वप्न होतं…

‘मला चित्रपटात पुरुषाची भूमिका करायचीय’; सई ताम्हणकरने सांगितला तिचा ड्रीम रोल

Video : “झुंड”चं सैराट प्रमोशन, नागराज “आण्णां”नी बडवली हलगी, आर्ची, परश्याचा भररस्त्यात झिंगाट डान्स!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.