मार्चमध्ये रिलीज होत आहेत हे 3 बिग बजेटचे चित्रपट, रणबीर कपूर आणि अजय देवगण यांच्यासोबत कोण ठरणार किंग?

अजय देवगणचा चित्रपट दृश्यम 2 अपवाद ठरला. 2022 मध्ये रिलीज झालेले बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप गेले. या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. मोठ्या बजेटचे चित्रपट फ्लाॅप गेल्याने बाॅलिवूडला मोठे नुकसान सहन करावे लागले.

मार्चमध्ये रिलीज होत आहेत हे 3 बिग बजेटचे चित्रपट, रणबीर कपूर आणि अजय देवगण यांच्यासोबत कोण ठरणार किंग?
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 9:07 PM

मुंबई : बाॅलिवूडचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत बाॅक्स ऑफिसवर (Box office) फ्लाॅप जाताना दिसत आहेत. मुळात म्हणजे कोरोनानंतर बाॅलिवूडच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. दुसरीकडे बाॅक्स ऑफिसवर साऊथच्या चित्रपटांच्या जलवा बघायला मिळाला. या दरम्यान अनेकांनी थेट बाॅलिवूडकडे चांगल्या स्टोरीच नसल्याचे म्हटले. बाॅलिवूडच्या अनेक लोकांनी साऊथ चित्रपटांकडे पाऊल वळवले. मात्र, याला अजय देवगणचा चित्रपट दृश्यम 2 (Drishyam 2) अपवाद ठरला. 2022 मध्ये रिलीज झालेले बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप गेले. या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. मोठ्या बजेटचे चित्रपट फ्लाॅप (Film Flap) गेल्याने बाॅलिवूडला मोठे नुकसान सहन करावे लागले.

2023 ची सुरूवात बाॅलिवूडसाठी चांगली नक्कीच ठरलीय. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर जलवा केला. विशेष म्हणजे या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले. पठाण चित्रपटाने एकाप्रकारे बाॅलिवूडला नवीन उमेद नक्कीच दिलीये. आता पठाण चित्रपटानंतर बाॅलिवूडचे काही बिग बजेटचे चित्रपट रिलीज होणार आहेत. पठाण चित्रपटानंतर रिलीज झालेले दोन चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप गेले.

पठाण चित्रपटानंतर कार्तिक आर्यन याचा रिलीज झालेला शहजादा हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप गेला. अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट 24 फेब्रुवारी रोजी रिलीज झाला. मात्र, हा चित्रपट देखील फ्लाॅप गेलाय. अजूनही बाॅलिवूडचे चित्रपट प्रेक्षकांना इंप्रेस करू शकले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

मार्च 2023 मध्ये बाॅलिवूडचे बिग बजेटचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटांचे काय होणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय. अजय देवगण याचा भोला हा चित्रपट 30 मार्चला रिलीज होतोय. या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. हा बिग बजेटचा चित्रपट आहे. मार्चमध्येच तू झूठी मैं मक्कार हा रणबीर कपूर याचा चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट 17 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

यासोबतच कपिल शर्मा याचाही Zwigato हा चित्रपट रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे तू झूठी मैं मक्कार या चित्रपटामध्ये रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर हे पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे प्रमोशनही जोरदार करताना रणबीर कपूर दिसत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन वेळी रणबीर कपूर याने एक वादग्रस्त विधान केले होते. ज्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टिकाही करण्यात आली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.