हे स्टार किड्स कायमच होतात ट्रोलिंगचे शिकार, कधी फिगर तर कधी कपडे, जाणून घ्या यांच्याबद्दल
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडमधील स्टार किड्स हे चर्चेत आहेत. कधी फोटोमुळे तर कपड्यांमुळे हे स्टार किड्स हे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतात. अनेकदा सोशल मीडियावर काही फोटो शेअर केल्याने देखील यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
मुंबई : अनेकदा बाॅलिवूडच्या जवळपास सर्वच स्टारला ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. कधी कपड्यांवरून तर कधी चित्रपटांवरून ट्रोलर्स (Trollers) यांना टार्गेट करताना दिसतात. फक्त बाॅलिवूड स्टारच नाहीतर त्यांच्या मुलांना म्हणजेच स्टार किड्स देखील बऱ्याच वेळा ट्रोल केले जाते. या यादीमध्ये अजय देवगण याची मुलगी न्यासा देवगण (Nysa Devgan) ही सर्वात वरती आहे. कायमच न्यासा देवगण ही ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. कोणत्याही कारणावरून न्यासा देवगण हिला ट्रोल केले जाते. काही दिवसांपूर्वीच ती एका पार्टीमध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर या पार्टीतील काही व्हिडीओ व्हायरल झाले आणि न्यासा देवगण ही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली.
चंकी पांडे याची लेक अनन्या पांडे ही बऱ्याच वेळा ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिचा लाईगर हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात साऊथचा स्टार विजय देवरकोंडा हा महत्वाच्या भूमिकेत होता. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला. हा चित्रपट फक्त आणि फक्त अनन्या पांडे हिच्याचमुळेच फ्लाॅप गेल्याचे ट्रोलर्सने म्हटले. बऱ्याच वेळा कपड्यांमुळेही अनन्या पांडे हिला ट्रोल केले जाते.
जान्हवी कपूर देखील कायमच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. जान्हवी कपूर ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. जान्हवी कपूर हिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जातात. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला. मिली या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनीच केलीये.
आमिर खान याची लेक इरा खान ही बाॅलिवूड चित्रपटांपासून चार हात दूर आहे. काही दिवसांपूर्वीच इरा खान हिने स्पष्ट सांगितले की, मला चित्रपटांमध्ये काम करण्यात काही खास रस नाहीये. मात्र, इरा खान ही देखील ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. काही दिवसांपूर्वी इरा खान हिने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी बिकिनी घातली होती. या बिकिनीवरून तिला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल केले गेले.
सारा अली खान हिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे सारा अली खान हिच्याकडे अनेक चित्रपटांच्या आॅफर आहेत. सारा अली खान ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. मात्र, सारा अली खान ही देखील ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. काही दिवसांपूर्वी सारा अली खान हिने पल पल न माने टिंकू जिया या गाण्यावर डान्स केला होता. ज्यानंतर तिला ट्रोल करण्यात आले.