Gandhi Jayanti 2021: ‘लगे रहो मुन्ना भाई’ पासून ते ‘गांधी माय फादर’ पर्यंत, गांधीजींच्या जीवनावर आधारित ‘हे’ चित्रपट देतील प्रत्येकाला प्रेरणा

महात्मा गांधींनी (Mahatma Gandhi) केवळ देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले नाही, तर संपूर्ण जगाला अहिंसेचा मार्ग अवलंबण्यास शिकवले. आज, 2 ऑक्टोबर रोजी, महात्मा गांधीं यांची जयंती (Gandhi Jayanti 2021), प्रत्येकजण त्यांची आठवण काढत आहे.

Gandhi Jayanti 2021: 'लगे रहो मुन्ना भाई' पासून ते 'गांधी माय फादर' पर्यंत, गांधीजींच्या जीवनावर आधारित ‘हे’ चित्रपट देतील प्रत्येकाला प्रेरणा
Mahatma Gandhi films
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 11:39 AM

मुंबई : महात्मा गांधींनी (Mahatma Gandhi) केवळ देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले नाही, तर संपूर्ण जगाला अहिंसेचा मार्ग अवलंबण्यास शिकवले. आज, 2 ऑक्टोबर रोजी, महात्मा गांधीं यांची जयंती (Gandhi Jayanti 2021), प्रत्येकजण त्यांची आठवण काढत आहे. जगातील लोक महात्मा गांधींच्या आदर्शांवर चालतात. गांधीजींच्या जीवनाविषयी अनेक कथा आहेत. लोकांनी त्याच्याबद्दल अनेक कथा ऐकल्या आहेत.

गांधीजींच्या जीवनाविषयी अनेक न ऐकलेल्या कथा आहेत. ज्यावर अनेक बॉलिवूड निर्मात्यांनी चित्रपट बनवले आहेत. प्रत्येक चित्रपट निर्मात्याने गांधीजींच्या जीवनातील काही पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. आज गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यांच्यावर बनवलेल्या काही चित्रपटांविषयी जाणून घेऊया…

गांधी माय फादर

दिग्दर्शक फिरोज अब्बास खान यांनी गांधीजींच्या जीवनावर चित्रपट बनवला. त्यांनी गांधीजी आणि त्यांचे पुत्र हरीलाल गांधी यांच्यातील नाते संबंधांवर चित्रपट बनवला. या चित्रपटाचे नाव गांधी माय फादर असे आहे. चित्रपटात दर्शन जरीवाला महात्मा गांधींच्या भूमिकेत दिसले होते, तर अक्षय खन्ना यांनी त्यांचा मुलगा हिरालालची भूमिका साकारली होती.

गांधी

1982 साली चित्रपट निर्माते रिचर्ड अॅटनबरो यांनी गांधींच्या जीवनावर ‘गांधी’ हा चित्रपट बनवला. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला. हॉलिवूड अभिनेता बेन किन्स्ली चित्रपटात गांधीच्या भूमिकेत दिसले होते.

लगे रहो मुन्नाभाई

जर गांधीजींच्या विचारधारेवर कोणताही चित्रपट बनला असेल, तर तो ‘लगे रहो मुन्ना भाई’ आहे. या चित्रपटाने गांधीजींच्या विचारांना एक वेगळे वळण दिले. त्याला ‘गांधीगिरी’ म्हणतात. मात्र, या चित्रपटात मुन्ना भाईंना गांधीजींना पाहण्याचा भ्रम होत असतो. पण तो त्याची गुन्हेगाराची मानसिकता बदलण्यात यशस्वी होतो.

द मेकिंग ऑफ महात्मा

चित्रपट निर्माते श्याम बेनीवाल यांनी महात्मा गांधींचे दिवस मोठ्या पडद्यावर दाखवले, जेव्हा ते दक्षिण आफ्रिकेत बॅरिस्टर म्हणून सराव करत होते. ते स्वातंत्र्यासाठी भारतात आले नव्हते, तेव्हाचा काळ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

हे राम

दिग्दर्शक कमल हासन यांनी गांधीजींची हत्या आणि देशाच्या फाळणीनंतर झालेल्या दंगलींवर आधारित चित्रपट बनवला. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह यांनी महात्मा गांधीं यांची भूमिका साकारली होती. चित्रपटात नसीरुद्दीन शाह सोबत अतुल कुलकर्णी, राणी मुखर्जी, गिरीश कर्नाड आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसले होते.

हेही वाचा :

Bigg Boss 15 House | यंदाचं सीझन जंगल थीमवर आधारित, पाहा ‘बिग बॉस 15’च्या घरातील इनसाईड फोटो!

Happy Birthday Kay Kay Menon | जाहिरात कंपनीसाठी काम करायचे के के मेनन, असा सुरु झाला होता चित्रपटसृष्टीतील प्रवास…

Happy Birthday Hina Khan | काश्मीरी असूनही कधीच मिळाली नाही ‘काश्मीरी’

Bigg Boss 15 | ‘बिग बॉस 15’च्या ग्रँड प्रीमियरमध्ये सलमान खान लावणार मनोरंजनाचा तडका, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल हा शो?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.