The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’ने कमाईमध्ये या चित्रपटांना टाकले मागे, अदा शर्माच्या चित्रपटाची धमाकेदार कमाई सुरू
द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. द केरळ स्टोरी या चित्रपटाला मोठा विरोध झाला. अनेकांनी थेट या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. मोठ्या विरोधानंतर हा चित्रपट 5 मे रोजी रिलीज झाला. आता चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे.
मुंबई : द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मुळात म्हणजे द केरळ स्टोरी (The Kerala Story) चित्रपटाचे टिझर रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी अनेकांनी केली. इतकेच नाही तर चित्रपटाच्या विरोधात अनेकांनी थेट कोर्टात धाव घेतली. मोठ्या विरोधानंतर शेवटी 5 मे रोजी द केरळ स्टोरी हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग केलीये. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. द केरळ स्टोरी या चित्रपटाच्या सपोर्टमध्ये अनेकांनी सोशल मीडियावर (Social media) पोस्ट देखील शेअर केल्या आहेत. सतत लोक या चित्रपटाला सपोर्ट करताना दिसत आहेत.
एकीकडे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठे क्रेझ जरी असले तरीही काही राज्यांमध्ये मात्र चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले आहेत. साऊथच्या अनेक शहरांमध्ये थिएटर मालकांनी चित्रपटाचे शो रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. तामिळनाडूमध्ये तर संपूर्ण राज्यात चित्रपटावर बंदी असून चित्रपटाचे सर्व शो रद्द करण्यात आले आहेत.
द केरळ स्टोरी चित्रपटाचे अनेक ठिकाणी शो रद्द करण्यात आले आहेत. तरीही बाॅक्स आॅफिसवर द केरळ स्टोरी हा चित्रपट धमाका करताना दिसतोय. द केरळ स्टोरी चित्रपटाने ओपनिंग डेला 8.3 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 11.22 कोटींचे कलेक्शन केले. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने 16.60 कोटींचे कलेक्शन केले आहे.
विशेष म्हणजे आता द केरळ स्टोरी चित्रपटाने अनेक महिला केंद्रित बाॅलिवूड चित्रपटांचे रेकाॅर्ड देखील तोडले आहे. महिला केंद्रित चित्रपटामध्ये धमाकेदार ओपनिंग करणाऱ्या यादीत द केरळ स्टोरी हा चित्रपट सातव्या क्रमांकावर राहिला आहे. वीरे दी वेडिंग- 10.70 कोटी, गंगूबाई काठियावाडी- 10.50 कोटी, द डर्टी पिक्चर- 9.54 कोटी, मणिकर्णिका- 8.75 कोटी, डियर जिंदगी 8.75 कोटी, रागिनी एमएमएस 2- 8.43 कोटी, द केरल स्टोरी- 8.03 कोटी, मैरी कॉम – 8 कोटी, राजी – 7.53 कोटी, जिस्म 2- 7.46 कोटी.
द केरळ स्टोरी चित्रपटाने तीन दिवसांमध्ये बाॅक्स आॅफिसवर जवळपास 35. 80 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे. चित्रपट अजून पुढील काही दिवस धमाका करेल असे सांगितले जातंय. विवेक अग्निहोत्री यांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चित्रपटाचे काैतुक केले होते. इतकेच नाही तर विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटाच्या टिमला मोठा इशारा देखील दिला होता.